Viral Video: कोल्हापुरात पुन्हा आला टस्कर हत्ती, शेतीचं नुकसान, शेतकरी चिंताग्रस्त, पाहा व्हिडीओ

Kolhapur Elephant: सोशल मीडियावर सध्या कोल्हापुरमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चंदगड तालुक्यातील जेलुगडे शिवारात पुन्हा टस्कर हत्तीचा वावर दिसून येत आहे.
Kolhapur Elephant
Viral VideoSaam Tv
Published On

Viral Video: गेल्या काही वर्षात शेत-शिवारात प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अनेकदा याच कारणांमुळे शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो तर अनेकदा या प्राण्यांची भितीसुद्धा असते. त्यातच सोशल मीडियावर एका अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात शेतांमध्ये सुगीची काम सुरू असतानाच हत्ती दाखल झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.

चंदगड(Chandgad) तालुक्यातील जेलुगडे इथल्या शिवारात काल सायंकाळी टस्कर हत्ती दाखल झाला आहे. पूर्वी मादी हत्ती आणि दोन पिले हेरे , वाघोत्री परिसरात दाखल झाली आहेत. या शिवाराला लागूनच असलेल्या पाटणे, जेलुगडे हद्दीमध्ये काल सायंकाळी नर हत्तीचा वावर दिसून आला. सध्या शिवारात भात आणि नाचणा मळणी तसेच भुईमुंग काढण्याची कामे सुरू आहेत.

काही ठिकाणी गवत कापणी केली जात आहे. सुगीची मोठी कामे अजूनही प्रलंबित असताना शिवारात हत्ती दाखल झाले आहेत. दरवर्षी ऐन सुगीच्या हंगामातच हत्ती(Elephant) दाखल होतात आणि कष्टाने पिकवलेले पीक फस्त करतात. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

कोल्हापूरमधील व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून 'SaamTvNews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच काही वेळात अनेक लाईक्स आणि मोठ्या प्रमाणात व्ह्यूज व्हिडिओला मिळालेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Kolhapur Elephant
Viral Video: खतरनाक! भररस्त्यात तरुणांचा बेफाम डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले राडा केला रावं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com