
मुंबई : तुम्ही देशात अनेक दारुच्या आहारी गेलेले व्यक्ती पाहिले असतील. दारुच्या आहारी गेलेले व्यक्ती सकाळ किंवा संध्याकाळ नशेतच दिसतात. तर काहींचे पावले संध्याकाळ होताच दारुच्या दुकानाकडे वळतात. दारुने व्यक्तीला अनेक आजार जडतात. दारुच्या आहारी गेलेल्या व्यक्तीमुळे घरातील वातावरणही बिघडून जातं. मात्र, समाजात दारुच्या आहारी गेलेले व्यक्ती पाहायला मिळतात. अशाच एका पठ्ठ्याने थेट हत्तीला दारु प्यायची सवय लावली. त्याची हीच चूक महागात पडली. एका चुकीने थेट त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दारु प्यायची सवय लागलेल्या हत्तीचं अथक प्रयत्नाने वनखात्याने व्यसन सोडवलं. याबाबतचा किस्सा हत्तीमित्र आनंद शिंदे यांनी सांगितला.
आनंद शिंदे यांची एलिफंट व्हिस्परर म्हणून ओळख आहे. शिंदे यांना हत्तीच्या मनातील भाषा अचूक समजते. ते हत्तींसह इतर प्राण्यांसोबत मराठीतून संवाद साधतात. हत्तीमित्र आनंद शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत संवाद साधताना आनंद शिंदे यांनी हत्तीची दारु कशी सोडवली, त्याचा आगळवेगळा किस्सा सांगितला.
आनंद शिंदे म्हणाले, 'केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील एक प्रकार आहे. या जिल्ह्यात एका हत्तीला चक्क दारुचं व्यसन लागलं होत. हत्तीचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीने केवळ मजा म्हणून हत्तीला दारू पाजली. या व्यक्तीने बूच भर दारू हत्तीच्या पाण्यात टाकली. दिवसेंदिवस त्याने हत्तीच्या दारुत वाढ केली. पुढे या हत्तीला दारुची सवय लागली. या व्यक्तीने एके दिवशी त्याने हत्तीला दारू दिली नाही. यामुळे हत्ती संतापला'.
'या हत्तीने रागाच्या भरात बॅकियार्डचं दार उद्धवस्त केलं. ही बाब अखेर वनखात्याच्या समोर आली. या व्यक्तीचा अनेक दिवसांपासून शांतपणे कारभर सुरु होता. या व्यक्तीचा कारनामा उघडकीस आल्यानंतर वनखात्याने त्याला अटक केली. तर या हत्तीला एलिफंट सेंटरला पाठवण्यात आलं. या हत्तीला सेंटरमध्येही दारुची आठवण यायची, असे ते म्हणाले.
'सात वाजल्यानंतर अचानक एकटक बघायचा. आम्ही या हत्तीची दारू सोडवली. त्या व्यक्तीने चढता क्रमा लावला होता. त्यानंतर आम्ही उतरता क्रम लावला. या हत्तीची दारू सोडवण्यासाठी ६ महिन्याची प्रक्रिया लागली, असे आनंद शिंदे पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.