Kolhapur News: अल्पवयीन मुलीची छेड, नागरिकांनी तरुणाला चोप चोप चोपला; पहा VIDEO

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या कोल्हापूरमधील एका घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात घटनेत एका तरुणाने अल्पवयीने मुलीची छेड काढली मात्र पुढे तरुणासोबत काय घडले ते पहा.
Shocking Viral Video
Kolhapur NewsSaam Tv
Published On

Gadhinglaj Viral Video: मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातल्या अनेक शहरात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.एक दिवस पूर्ण होत नाही तो पर्यंत कुठे हत्या,अत्याचार तर मारहाण,गोळीबार अशा धक्कादायक घटना ऐकण्यास मिळतात.मात्र त्यातही गेल्या वर्षभरापासून महिला अत्याचारात वाढ झालेली आहे,असे असताना गडहिंग्लजमधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे,ज्यात एक तरुणाने बस स्थानकासमोर अल्पवयीन मुलीची छेड काढली आहे,मात्र त्यानंतर त्यात तरुणाला नागरिकांनी चोप दिलेला आहे.सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेली संपूर्ण घटना कोल्हापुरमधील गडहिंग्लज येथील आहे.जिथे गडहिंग्लज एसटी स्टँड समोर अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याचा प्रकार झाला होता,मात्र नागरिकांच्या हे लक्षात येताच.संपूर्ण नागरिकांनी तरुणाला चोप दिला आहे.शिवाय त्यानंतर तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.गेल्या आठ दिवसातील मुलींची छेड काढण्याचा दुसरा प्रकार समोर आलेला आहे.

गडहिंग्लज परिसरात मुलींची छेड काढण्याचे प्रमाण वाढलं आहे.सध्याचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गाने मोठा संताप व्यक्त केलेला आहे.सर्व व्हिडिओ तुम्हाला इन्स्टाग्रामवरील 'saamtvnews'या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.मुंबई आणि पुण्यातील महिला अत्याचारीची घटना ताजी असताना कोल्हापुरमधील अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या या प्रकारानंतर प्रत्येकजण हैराण आहे.

तरुणाला चोप दिलेला व्हिडिओ(Video) व्हायरल झाल्यानंतर प्रत्येक नेटकरी वर्गातून विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''बरे झाले हाणले'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,'रोज अशा घटना पाहण्यास मिळत आहे'',तर काही यूजर्संनी लिहिले आहे की,'पोलिसांनी चांगलेच हाणले पाहिजे'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Viral Video
Nagpur Shocking : अंत्यविधीला ७५००० रुपये, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला VIDEO; लग्नाच्या वाढदिवशी नवरा-बायकोने एकाचवेळी मृत्यूला कवटाळलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com