
कुंभमेळ्यात हा आयआयटी बाबा दिसला आणि त्याची देशभरात चर्चा झाली ती त्याच्या शिक्षणाची...एवढं शिक्षण घेऊन मोठ्या पगाराची नोकरी या बाबाने का सोडली? असे सवालही विचारण्यात आले...मात्र, हा आयआयटीयन, बाबा नसून आयएसआयचा हेर असल्याचा दावा करण्यात आलाय...यामुळे एकच खळबळ उडालीय...मात्र, या दाव्यात कितपत तथ्य आहे...? खरंच हा बाबा हेर आहे का...? याची सत्यता जाणून घेण्याची गरज आहे...पण, मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की, 'आयआयटीयन बाबा हा आयएसआयचा हेर आहे. आयआयटी रोपरचा माजी विद्यार्थी आहे. ब्रह्मोस अवकाश संशोधन संस्थेत इंजिनीअर बनला आणि त्यानंतर ISI साठी हेरगिरी करताना पकडला गेला. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली'.
जन्मठेपेची शिक्षा सुनावूनही हा आयआयटीयन बाबा कुंभमेळ्यात आल्याचा दावा करण्यात आलाय...मात्र, खरंच या बाबाला जन्मठेपेची शिक्षा झालीय का...? याआधी त्याला अटक झाली होती का...? कुंभमेळ्यात हा बाबा आलाच कसा...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...कारण, याआधी जुना आखाड्याचे महंत यांनीही हा बाबा फेक असल्याचं म्हटलं होतं...त्यामुळे या दाव्याची पडताळणी करणं गरजेचं आहे...आमच्या टीमने याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी केली...याबाबत अधिक माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
आयआयटी बाबाची तुलना निशांत अग्रवालशी करण्यात आली
आयआयटीबाबा आणि निशांत अग्रवाल दोन्ही वेगळे
अभय सिंह असं आयआयटी बाबाचं नाव
अभय सिंहने 2008 ते 2012 साली मुंबईतून शिक्षण घेतलं
आयआयटी मुंबईतून एयरोस्पेस इंजिनीअरिंगची पदवी घेतली
दावा केलेली व्यक्ती ही निशांत अग्रवाल आहे...या निशांत अग्रवालला 8 ऑक्टोबर 2018 रोजी अटक झाली होती...त्यानंतर ब्रह्मोस मिसाईल प्रकरणात गुप्त माहिती पाकिस्तानच्या ISI ला पुरवल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली...मात्र, महाकुंभमेळ्यात असलेला आयआयटी बाबाचा आयएसआयशी संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय...त्यामुळे आमच्या पडताळणीत आयआयटी बाबा ISIचा हेर असल्याचा दावा असत्य ठरलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.