Dhanshri Shintre
महाकुंभ मेळा त्रिवेणी संगमावर भरतो, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम होतो, हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे.
कुंभमेळ्याला जाण्याचा विचार करत असाल, तर जत्रेदरम्यान काही महत्त्वाच्या टिप्स पाळा, ज्यामुळे तुमचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायी होईल.
कुंभमेळ्यादरम्यान, विशेषतः रात्री संगम परिसरात थंडी तीव्र होऊ शकते, त्यामुळे स्वेटर, मफलर, हातमोजे आणि टोपीसारखे उबदार कपडे सोबत बाळगणे गरजेचे आहे.
कुंभमेळ्यादरम्यान लांब अंतर पायी चालावे लागते आणि रस्ते नादुरुस्त असण्याची शक्यता असते, म्हणून आरामदायक शूज किंवा सँडल घालणे आवश्यक आहे.
कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने किरकोळ दुखापत किंवा ताप येण्याची शक्यता असते, त्यामुळे डोकेदुखी, ताप आणि पोटदुखीसाठी आवश्यक औषधे सोबत ठेवावीत.
गर्दीच्या ठिकाणी हात स्वच्छ ठेवणे अत्यावश्यक आहे. सार्वजनिक शौचालय वापरताना हँड सॅनिटायझर किंवा कागदी साबणाचा वापर केल्याने स्वच्छतेची काळजी घेतली जाऊ शकते.
कुंभमेळ्यादरम्यान पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा आणि भरून ठेवा, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील आणि थकवा टाळता येईल.
कुंभमेळ्यातील सुरक्षेसाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड यांसारखी ओळखपत्रे नेहमी सोबत ठेवावीत, जे आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतात.
कुंभमेळ्यादरम्यान अधिक वेळ बाहेर राहिल्यामुळे सूर्यकिरणांमुळे त्वचेला हानी पोहोचू शकते, म्हणून त्वचेला सनबर्नपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन लावणे अत्यावश्यक आहे.