
Viral Video: सोशल मीडियावर दररोज विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडिओत कधी तुम्हाला लोकांच्या नवीन जुगाड व्हिडिओ पाहण्यास मिळतात तर कधी अतिशय गमतीदार व्हिडिओ पाहण्यास मिळतात ,पंरतू अनेकदा असे काही व्हिडिओ असतात जे पाहून भल्याभल्यांना काय म्हणावे सुचणार नाही. नक्की काय घडले आहे व्हायरल व्हिडिओत तुम्ही एकदा पहा.
व्हायरल(Vral) होत असलेल्या व्हिडिओत एक ट्रेन एका ठिकाणी थांबलेली आहे. जर तुम्ही पाहिले तर आजूबाजूचा संपर्ण परिसर हा ऊसाच्या शेताचा आहे. ट्रेन थांबल्यानंतर ट्रेनमधील काही प्रवाशांनी थेट बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतातून ऊस चोरुन आणताना दिसत आहे. कहर तर तेव्हा चोरुन आणत असलेला ऊस ते थेट ट्रेनमधून घेऊन जात आहे. संपूर्ण कारनाम्याचा व्हिडिओ ट्रेनमधील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की कुठल्या गावातील आहे हे समजले नाही मात्र सध्या ''इन्स्टाग्राम'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो इन्स्टावरील ''tunmun_pandit_88'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. ७ डिसेंबर रोजी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आतापर्यंत व्हिडिओला हजारो नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहे तर मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत.
संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया कमेंटबॉक्समध्ये केलेल्या आहेत, त्यातील पहिल्या यूजरने लिहिले आहे की,''अरे देवा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' असं नको करायला पाहिजे'' तर एकहून अधिक यूजर्संनी अशा घटनेवर संतापजनक प्रतिक्रियाच केलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.