
Dance Viral Video: सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांपासून लग्नातील अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लग्नातील अनेक परंपरा तर कधी गमतीदार गोष्टी पाहण्यासाठी मिळतात. त्यात पुन्हा एकदा लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ चक्क वरातीत डान्स करत असलेल्या नवरीचा आहे.
व्हायरल व्हिडिओत तुम्हाला लग्नाची वरात सुरु असलेली दिसत आहे. वरातीत घरातील अनेक सदस्य डान्स करताना दिसत आहे. जर तुम्ही पाहिले तर लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण उपस्थित आहे, मात्र व्हिडिओत(Video) पुढे पाहिले तर वरातीत नवरा-नवरीसाठी जो रथ असतो त्यावर चढून नवरदेव आणि नवरीबाई जोरदार डान्स करत आहे. नवरीचा डान्स पाहून तिथे असलेला प्रत्येकजण हैराण झालेला आहे तर नवरी सर्वांना विसरुन आनंदाने डान्स करत आहे.
नवरा-नवरीचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''rdx__prashant_'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''नुसता राडा'', असे लिहिण्यात आलेले आहे. सहा दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर हजारो नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहे तर मोठ्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत.
वरातीत डान्स करत असलेला हा व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील किंवा गावातील आहे हे समजू शकलेले नाही, मात्र सध्या नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतील आलेला आहे शिवाय नेटकऱ्यांनी कमेटबॉक्समध्ये अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत,त्यातील पहिल्या यूजरने लिहिले आहे की,''याला म्हणतात ३६ गुण जुळणे एक नंबर भावा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''माला नवरीचा डांस आवडला'',''स्वर्गात बनलेली जोडी'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टिप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.