Viral Video: नसती मस्ती आली अंगाशी! बैलासमोर डान्स करणाऱ्या व्यक्तीला मिळाला धडा; VIDEO व्हायरल

Funny Video: सोशल मीडियावर तुम्हाला एका व्यक्तीचा गमतीदार व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत आहे. मात्र त्यात त्याला बैलाशी मस्ती करणं अत्यंत महागात पडलेले आहे, जाणून घ्या नेमके काय घडले असेल.
Funny Video
Viral VideoSaam Tv
Published On

Man Viral Video: सोशल मीडियावर तुम्हाला जगभरातील अनेक घटनांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. व्हायरल व्हिडिओ पाहून अक्षरशा: पोट धरुन आपण हसतो तर कधी डोळ्यातून पाणी येई पर्यंत रडतो. त्यातच सध्या सोशल मीडियावर एक गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात व्हिडिओत एका व्यक्तीला बैलासमोर उभं राहून मस्ती करणं अत्यंत महगात पडलेले आहे. नक्की काय घडले ते तुम्ही एकदा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पहा.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्ही पाहु शकता, एक गावाकडील भाग दिसत आहे. या परिसरात काही व्यक्ती बैल घेऊन जात आहे मात्र तेवढ्याच एक मद्यधुंद अवस्थेत एक व्यक्ती येतो आणि बैलाच्या तोंडाजवळ जाऊन डान्स करु लागतो, डान्स करता करता तो व्यक्ती बैलाच्या तोंडाला हात लावतो त्यामुळे बैलाने त्या व्यक्तीला जोरात शिंगाणे दुसरीकडे उडवून लावतो त्यामुळे तो व्यक्ती चक्क बैलाच्या धडकेत जमिनीवर आपटतो. सर्व प्रकार तेथिल एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ तुम्हाला ''Ghar Ke Kalesh'' या अकाउंटवर पोस्ट झालेला दिसून येईल. व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर अनेक व्ह्यूज व्हिडिओला मिळाले आहे तर मोठ्या संख्येने व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळालेली आहे. मात्र व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे हे समजू शकलेले नाही.

सोशल मीडियावर व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस पडलेला आहे, शिवाय अनेक प्रतिक्रिया ही केलेल्या आहेत. त्यातील कमेटबॉक्समध्ये एका यूजरने लिहिले आहे की,'' काय ती मस्ती'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''पोट धरुन हसलो'' तर अशा गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Funny Video
Viral Video: अगं बाई! 'साजन जी घर आये' गाण्यावर चिमुकलीने धरला ठेका; मात्र पुढे जे झाले ते पाहून नेटकरी म्हणाले....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com