Viral: नारंगी केसाच्या मूर्ख माणसाने...! गॅस टंचाईवर पुण्यातील हॉटेलने लावलेली नोटीस व्हायरल

Pune viral news: पुण्यातील एका हॉटेलने दरवाढीची माहिती देण्यासाठी लावलेला मजेशीर फलक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जागतिक घडामोडींवर विनोदी भाष्य करत दिलेली ही नोटीस लोकांना खूपच आवडली आहे.
Pune viral news
Pune viral newssaam tv
Published On

मजेशीर सूचनांचा बोर्ड म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यात पुणे या शहराचं नाव येतं.‘बर्वे दहीवडा’ या हॉटेलने दरवाढीची माहिती देताना लावलेला एक विनोदी असा फलक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. साधारण दरवाढीची सूचना देण्याऐवजी या फलकात जागतिक घडामोडींवर अगदी गमतीने भाष्य करण्यात आलंय.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये ही सूचना चिटकवलेली दिसते. यामध्ये लिहिल्यानुसार, नारंगी केसाच्या मूर्ख माणसाने केलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाल्या कारणाने प्लास्टिक कंटेनर आणि गॅसच्या किमती वाढल्या आहेत, म्हणून नवीन दर 21 मार्च पासून लागू होत आहेत, कृपया सहकार्य करा नाहीतर युद्ध थांबवा.

Pune viral news
Viral wedding video: नवऱ्याचा हटके स्टाइल पाहून लोक थक्क, लाईट्सच्या ड्रेसमुळे व्हिडिओ झाला व्हायरल

या व्हायरल सूचनेत लिहिलेल्या मजकुरातून अप्रत्यक्षपणे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख केल्याचं तुम्हाला समजेल. या फोटोला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय.

Pune viral news
Inspiring story: “स्वप्न पूर्ण झालं, आता नवस!” 140 किमी धावून देवीला दिलेला शब्द पाळला, वाचा

अनेकांनी या हटके कल्पनेचे कौतुक केलं असून 'दरवाढ सांगण्याची ही खूपच क्रिएटिव्ह पद्धत आहे' अशी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी 'हसत-खेळत गंभीर मुद्दा मांडला आहे' असं म्हणत या फलकाचे समर्थन केलंय.

Pune viral news
Viral Video: प्रेझेंटेशन देताना आला बॉयफ्रेंडचा मेसेज, स्क्रिनवर टेक्स पाहून क्लासमध्ये पसरला हशा, Video

पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होताना दिसतेय. याचा थेट परिणाम इंधन दरांवर होतो आणि त्यातून एलपीजीच्या किमती वाढतात. लहान खाद्य व्यवसायांसाठी ही वाढ मोठा आर्थिक ताण निर्माण करू शकते. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च वाढल्याने अनेकांनी मेनूचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com