

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे अनपेक्षित घटनांमुळे युजर्सचं लक्ष वेधून घेतात. सध्या एका क्लासरूममधील व्हिडिओ सोशल मिडीयार तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये प्रेझेंटेशनदरम्यान अचानक आलेल्या एका मेसेजमुळे संपूर्ण वर्गात हशा पिकतो.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका वर्गात एक मुलगी प्रेझेंटेशन देताना दिसते. प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी तिचा मोबाईल फोन प्रोजेक्टरला कनेक्ट केलेला असतो. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक फोनवर ‘I Love You Babe’ असा मेसेज येतो आणि तो थेट प्रोजेक्टर स्क्रीनवर पॉप-अप होतो.
हा मेसेज सर्व विद्यार्थ्यांना दिसताच वर्गात सर्वजण जोरजोरात हसू लागतात. परिस्थिती अचानक बदलल्यामुळे प्रेझेंटेशन देणारी मुलगी काही क्षणांसाठी अडचणीत सापडल्याचं दिसतं.
यानंतर व्हिडिओमध्ये एक मुलगा उठून पुढे येतो, जो कदाचित फोन डिस्कनेक्ट करण्याचा किंवा तो मेसेज हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. हा संपूर्ण प्रसंग कॅमेरामध्ये कैद झाला असून त्याच क्षणामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.
हा व्हिडिओ एक्स या प्लॅटफॉर्मवर @terakyalenadena नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी काही युजर्सनी गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने 'हेही बरोबर आहे' अशी प्रतिक्रिया दिली, तर दुसऱ्याने 'कशी पकडली गेली' असं लिहिलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.