Inspiring story: “स्वप्न पूर्ण झालं, आता नवस!” 140 किमी धावून देवीला दिलेला शब्द पाळला, वाचा

Man runs 140 km to fulfill promise after joining army: आर्मीमध्ये भरती झाल्यानंतर दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी एका तरुणाने तब्बल 140 किलोमीटर धावत देवीचं दर्शन घेतलं.
Man runs 140 km to fulfill promise after joining army
Man runs 140 km to fulfill promise after joining armySAAM TV
Published On

“शब्द दिला होता… आणि तो पूर्ण करायचाच होता!” हीच भावना मनात ठेवून सांगोला तालुक्यातील एका तरुणाने आपल्या जिद्दीची आणि श्रद्धेची अशी कहाणी घडवलीये. या तरूणाने केलेलं कृत्य हजारो लोकांसाठी प्रेरणादायी ठरतंय.

देवीच्या दारी तरूणाचा अनोखा नवस

सांगोला परिसरातील निलेश दत्तात्रय डिवसे या तरुणाने एक अनोखा नवस केला होता. “आर्मीमध्ये भरती झालो तर देवीच्या दर्शनासाठी तुझ्या दारापर्यंत धावत येईन,” असा त्याने निर्धार केला होता. अनेकांसाठी हा फक्त एक भावनिक संकल्प वाटला असता. पण निलेशने हा नवस त्याच्या आयुष्याचं ध्येयच बनवलं.

Man runs 140 km to fulfill promise after joining army
Viral wedding video: नवऱ्याचा हटके स्टाइल पाहून लोक थक्क, लाईट्सच्या ड्रेसमुळे व्हिडिओ झाला व्हायरल

कठोर मेहनत, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर निलेश अखेर आर्मीमध्ये भरती झाला. त्याच्या आयुष्यातील हा मोठा टप्पा होता. पण त्याच्यासाठी खरी परीक्षा अजून बाकी होती. कारण आता वेळ होती ती दिलेला शब्द पाळण्याची. भरती झाल्यानंतर त्याने एक क्षणही न दवडता आपल्या नवसाची पूर्तता करण्याचा निर्णय घेतला.

140 किलोमीटर अंतर धावत केलं पूर्ण

निलेशने तब्बल 140 किलोमीटर अंतर धावत पूर्ण करत देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचण्याचा पराक्रम केला. हा प्रवास केवळ शारीरिकदृष्ट्या कठीण नव्हता, तर मानसिक ताकदीचीही मोठी कसोटी होती. वाटेत आलेल्या अडचणी, थकवा यांचा सामना करत त्याने आपला निर्धार कायम ठेवला.

या संपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. निलेशची ही कथा पाहून अनेक तरुण प्रेरित होत आहेत. त्याच्या जिद्दीचं, मेहनतीचं आणि देवावरील श्रद्धेचं सगळीकडे कौतुक केलं जातंय.

Man runs 140 km to fulfill promise after joining army
Viral Video: रील बनवण्याच्या नादात जीव धोक्यात! सापाच्या तोंडाला जीभ लावण्याचा स्टंट तरूणाला पडला महागात, VIDEO

“स्वप्न मोठं असलं, आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, तर यश मिळतंच,” हा संदेश निलेशच्या कृतीतून स्पष्टपणे दिसून येतंय. आज निलेश डिवसे हा केवळ एक आर्मी जवान नाही, तर तो जिद्द, श्रद्धा आणि शब्द पाळण्याचं जिवंत उदाहरण बनलाय.

Man runs 140 km to fulfill promise after joining army
Viral video: धक्कादायक! रील्स बघून मुलांनी बनवली जीवघेणी वस्तू; व्हिडिओ पाहून पालकही झाले हैराण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com