Viral Video: रील बनवण्याच्या नादात जीव धोक्यात! सापाच्या तोंडाला जीभ लावण्याचा स्टंट तरूणाला पडला महागात, VIDEO

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने सापाच्या तोंडाजवळ जाऊन धोकादायक स्टंट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा स्टंट करताना सापाने त्याच्या नाकाला चावा घेतलाय.
Snake Bites Man
Snake Bites Mansaam tv
Published On

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही इतके धक्कादायक असतात की ते पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक थरारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये एक व्यक्ती सापासोबत अत्यंत धोकादायक स्टंट करताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती सापाच्या तोंडाला स्वतःची जीभ लावताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये पुढे जे घडतंय ते पाहून तुम्हालाही शॉक बसू शकतो.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

‘edohanzo117’ नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये त्या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळालेत. बऱ्याच लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं असून अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Snake Bites Man
Viral Video: एक्स गर्लफ्रेंड स्टेजवर आली, नवऱ्याला Kiss केलं, त्यानंतर नवरीने जे काही केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का

काय घडतंय व्हिडीओमध्ये?

एक व्यक्ती सापासमोर उभा राहून त्याच्याशी खेळ करताना दिसतोय. तो मुद्दाम सापाच्या तोंडाजवळ जातो आणि स्वतःची जीभ सापाच्या तोंडाला लावण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला काही क्षण सर्व काहीच घडत नाही. मात्र पुढच्याच क्षणी साप अचानक पलटवार करतो. यावेळी साप त्याचा नाकाला चावा घेत असल्याचं दिसतंय.

Snake Bites Man
Girl Dance In Local Train: पोलिसांसमोर तरुणीने ट्रेनमध्येच लगावले ठुमके; पुढे जे घडलं ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...

साप हे अत्यंत धोकादायक मानला जातो. त्यामुळे त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ नेहमी देतात. मात्र काही लोक रील्स बनवण्याच्या नादात अशा प्रकारचे धोकादायक स्टंट करताना दिसतात. अनेक वेळा अशा कृतींचे गंभीर परिणामही होऊ शकतात.

Snake Bites Man
Viral Video : हीच खरी माणुसकी! भटक्या कुत्र्यासाठी सफाई कामगार महिलेच्या रूपात अवतरला देव; हृदयस्पर्शी VIDEO

सोशल मीडियावर यासंदर्भात विविध प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. काही युजरने हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलंय. एका युजरने कमेंट करत लिहिलंय की, 'असा स्टंट करणं म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे.' तर दुसऱ्या एका युजरने आश्चर्य व्यक्त करत म्हटलंय की, 'हे पाहून विश्वासच बसत नाही की कोणी असा स्टंट करू शकतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com