Viral wedding video: नवऱ्याचा हटके स्टाइल पाहून लोक थक्क, लाईट्सच्या ड्रेसमुळे व्हिडिओ झाला व्हायरल

Groom wearing light bulb dress viral video: लाईट्सचे बल्ब लावलेला नवऱ्याचा अनोखा पोशाख सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हटके स्टाईलमुळे हा व्हिडिओ चर्चेत आला असून युजर्सकडून मजेदार आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
unique wedding
unique weddingsaam tv
Published On

सोशल मीडियावर सध्या एका लग्नसोहळ्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये नवऱ्याने परिधान केलेल्या आगळ्या-वेगळ्या पोशाखाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. विशेष म्हणजे या पोशाखावर लाईट्सचे बल्ब लावलेले आहेत. या वेगळ्या अंदाजामुळे हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक नवरा त्याच्या लग्नासाठी सजलेला दिसतो. मात्र, त्याचा पोशाख इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याने असा ड्रेस घातलेला आहे ज्यावर अनेक छोटे-छोटे बल्ब लावलेले आहेत. ते बल्ब पेटत असून दिवाळीतील लाईट्सप्रमाणे ते लागलेले आहेत. त्यामुळे तो नवरा अक्षरशः ‘चालता-बोलता पावर हाऊस’ असल्यासारखा दिसतो.

unique wedding
Viral Video: ट्रकला अचानक लागली आग, ७० वर्षीय ड्रायव्हरने पेटता ट्रक चालवत थेट नेला फायर स्टेशनमध्ये, पाहा Video

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील ‘samsuddin_ansari_aryan’ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला असून हजारो लोकांना तो आवडलाय. युजर्सनी या व्हिडिओवर विविध विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी 'हा नवरा वीज विभागात काम करत असावा' अशा विनोदी कमेंट केल्यात. तर काहींनी 'हा खरा स्वॅग आहे' असं म्हटलंय.

एका युजरने लिहिले, “असा नवरा पहिल्यांदाच पाहतोय, खूपच वेगळा आयडिया आहे,” तर दुसऱ्याने म्हटलंय की, “लग्नात लाईटिंगची गरजच नाही, नवरा पुरेसा आहे.”

unique wedding
Viral trending news: एक खिडकी उघडी ठेऊन केली मोठी चूक; तीन वर्षांनी घरी परतला आणि पाहिलं तर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com