Viral Video: धक्कादायक! चोरी करण्यासाठी महिलांची अनोखी शक्कल;मेट्रोच्या बाहेर महिलेला घेरलं अन्...; घटनेचा Video व्हायरल

Delhi Metro Viral Video: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Delhi Metro Viral Video
Delhi Metro Viral VideoSAAM DIGITAL
Published On

Delhi Metro Viral Video

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील राजीव चौक मेट्रो स्टेशनवर दिवसाढवळ्या मेट्रोत चोरीची घटना घडली आहे. या घटनेमुळे मेट्रो परीसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

दिल्ली मेट्रो अन् व्हायरल व्हिडिओ हे समीकरण काही नेटकऱ्यांसाठी नवीन नाही. दिल्ली मेट्रो, बस किंवा दिल्लीतील कोणताही परिसर गुन्हेगारीच्या प्रकरणामुळे नेहमी र्चेतच असतो. कधी कपल्स आपल्या मर्यादा ओलांडताना दिसून येतात. तर कधी दिल्लीतील मेट्रोमध्ये विचित्र प्रकार घडताना दिसतात.यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Delhi Metro Viral Video
Viral Video: आजोबा म्हणजे आजोबाच असतो...! आजोबा अन् नातीमधल्या भावूक प्रंसगांचा VIDEO व्हायरल

मात्र आता दिल्लीतील मेट्रोने प्रवास करत असाल तर थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सध्या सोशल मीडियावर मेट्रोमध्ये जाण्याचा बहाणा करुन काही महिलांनी एका प्रवाशी महिलेच्या बॅगमधील वस्तू चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. नक्की काय घडलं? जाणून घ्या.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की,दिल्लीतील मेट्रोत चढण्यासाठी मेट्रो स्टेशनवर प्रवाशांची गर्दी दिसून येतेय. ज्यामध्ये गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली प्रवासी महिला मेट्रोमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असते. त्याचवेळी काही महिला तिच्या पाठीमागे येऊन चारही बाजूंनी घेरतात. तसंच तिला गर्दीच्या बहाण्याने धक्काबुक्की करण्यास सुरुवात करतात. मग संधीचा फायदा घेत तिच्या पर्समधून काही वस्तू चोरतात. प्रवासी महिला मेट्रोमध्ये जाते त्याचवेळी चोरी करणाऱ्या महिला चोरी करुन झाल्यानंतर मागे हटतात.

हा व्हिडीओ हा @Nitinparashar या एक्स अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओतील प्रकार धक्कादायक आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण अवाक झाला असेल. व्हायरल झालेला व्हिडीओ हा राजीव चौक स्टेशनचा असल्याचे समजंत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. व्हायरल व्हिडीओ मेट्रोस्टेशनवरील व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केलीय. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे.यावर नेटकऱ्यांनी म्हटल आहे की, 'दिल्ली पोलिसांनी आवश्यक कारवाई करावी.'

Delhi Metro Viral Video
Viral Video: भयंकर! किचनच्या सिंलिगमध्ये आढळला भला मोठा किंग कोब्रा, जिगरबाज महिलेनं केली सुटका, Video व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com