Bikanervala Chairman Kedarnath Aggarwal Dies: 'बीकानेरवाला'चे संस्थापक केदारनाथ अग्रवाल यांचं निधन, दिल्लीत सुरु केला होता व्यवसाय

Bikanervala Chairman Kedarnath Aggarwal Dies: 'बीकानेरवाला'चे संस्थापक केदारनाथ अग्रवाल यांचं सोमवारी दिल्लीत निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते.
Bikanervala Chairman Kedarnath Aggarwal Dies
Bikanervala Chairman Kedarnath Aggarwal DiesSaam tv
Published On

Bikanervala Chairman Kedarnath Aggarwal Dies:

'बीकानेरवाला'चे संस्थापक केदारनाथ अग्रवाल यांचं सोमवारी दिल्लीत निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. केदारनाथ अग्रवाल यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अग्रवाल यांनी दिल्लीत व्यवसायाला सुरुवात केली होती. (Latest Marathi News)

केदारनाथ अग्रवाल यांनी १९५० साली दिल्लीच्या चांदनी चौकातील पराठा गल्लीजवळ बीकानेर नमकीन भंडार नावाचं दुकान सुरु झालं. त्यांचं हे दुकान खूप प्रसिद्ध झालं. या दुकानाच्या पुढे देशभरात उघडल्या गेल्या. काही वर्षांत त्यांचा व्यवसाय २३०० कोटींच्या घरात पोहोचला. त्यांचा व्यवसाय जगभरातील ३० देशात पोहोचला आहे.

दोन अग्रवाल बंधूंनी सर्वात आधी चांदनी चौकानंतर फतेहपुरी आणि करोल भाग येथे दुकान सुरु केलं. या दुकानात त्यांनी रसगुल्ले, 'नमकीन' आणि मूग दाळीचा हलवा विक्री करत होते. अग्रवाल बंधू यांच्या दुकानातील पदार्थ अल्पावधित दिल्लीत प्रसिद्ध झाले.

आज दिल्ली-एनसीआर क्षेत्रात बीकानेरवालाच्या ७५ शाखा आहेत. दिल्लीत व्यवयायाला भरभराटी मिळाल्यानंतर पुढे देशभरातही 'बिकानेरवाला' दुकानांच्या पदार्थांना प्रसिद्धी मिळाली.

९९५ साली पेप्सिकोसोबत केला करार

नमकीन आणि मिठाईची विक्री जगभरात करण्यासाठी त्यांनी १९९८ साली 'बिकानो'च्या नावाखाली पदार्थांचे पॅकेज करण्याची तयारी सुरु केली. तर त्यांनी १९९५ साली पेप्सिकोसोबत एका करार करून एक नवा ब्रँड तयार केला होता. त्या ब्रँडला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

Bikanervala Chairman Kedarnath Aggarwal Dies
Crime News: खळबळजनक! वाळू माफियांनी पोलीस अधिकाऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडलं; भररस्त्यात घडला थरार, आरोपी फरार

आज जगभरात १५० जागांवर शाखा

आज बीकानेरवाला आणि बिकानो समूहाचे भारत आणि जगभरातील ३० देशात १५० जागांवर 'बीकारनेरवाला'चे दुकानाच्या शाखा आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com