Manasvi Choudhary
ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात यादरम्यानची काळजी रेल्वे प्रशासन घेत असते.
इंडियन रेल्वे प्रवाशांसाठी सतत नवनवीन सुविधा आणत असते.
रेल्वेने प्रवांशासाठी आनंदाची बातमी दिली आहे
ट्रेनमधील प्रवासादरम्यान प्रवाशांची तब्येत बिघडली तर स्वस्तात स्टेशनवर औषधे उपलब्ध केली आहेत.
रेल्वेची स्वस्त औषध योजना देशभरातील 50 रेल्वे स्थानकांवर असणार आहे.
ही केंद्रे 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात सुरू केली जातील. मुख्य म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, जम्मू काश्मीर, उत्तराखंड.
दीनदयाल उपाध्याय जंक्शन, वीरांगना लक्ष्मीबाई, लखनौ, गोरखपूर, बनारस, आग्रा कँट, मथुरा, ऋषिकेश, काशीपूर, दरबंगा, पाटणा, कटियार, जांगगीर-नायला, बागबर्हा, सिनी, अंकलेश्वर, मेहसाणा, पेंद्र रोड, रतलाम, मदलम बिना, सवाई माधोपूर, भगत की कोठी, फगवाडा आणि राजपुरा ही मुख्य स्थानके आहेत जिथे केंद्रे उघडली जातील.