Viral News
Latur NewsSaam Tv

Latur News: लातूरमध्ये मनालीचा फील, दवबिंदू गोठले, शिवारात बर्फाचा थर, पाहा व्हिडीओ

Viral News: सोशल मीडियावर सध्या लातूर जिल्ह्यातील वातावरणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओत लातूरमध्ये थंडीचे प्रमाण किती आहे हे दिसून येत आहे.
Published on

Viral Video: लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून थंडीचा जोर वाढू लागला आहे. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस घटत चालला आहे.दरम्यान याचा परिणाम औसा तालुक्यातल्या नकुलेश्वर बोरगाव शिवारात पाहायला मिळालाय.आज पहाटे दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली, तसेच शिवारात गवतावर बर्फाची चादर देखील पाहायला मिळाली आहे.

लातूर (Latur) जिल्ह्यातील तापमान आज ९ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले गेल आहे.त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत, नागरिक उबदार कपड्यांना पसंती देत आहेत. सोशल मीडियावर सध्या सर्व दृश्यांचा व्हिडिओ (Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओला नागरिकांची मोठी पंसती मिळत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला शेतशिवार दिसून येत आहे, जर तुम्ही या व्हिडिओत पाहिले तर शेतात असलेल्या पिंकावर आणि गवतावर बर्फाची चादर पसरलेली आहे. सोशल मीडियावर या आधी प्रत्येक जिल्ह्यात पडलेल्या थंडीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहे, मात्र हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लातूर जिल्ह्यातील व्हिडिओ युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ युट्युबवरील''SaamTvNews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही मिनिटात अनेक नेटकऱ्यांनी पाहिला आहे तर अनेक यूजर्संनी व्हिडिओला लाईक्सही केलेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral News
Viral Video: नाच रे मोरा आंब्याच्या वनात गाण्यावर बालमित्र थिरकले; शाळेच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केला डान्स; पहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com