

सोशल मीडियावर आई-मुलाच्या नात्यातील भावनिक क्षणाचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका मुलाने आपल्या आईचं अनेक वर्षांपासूनचं असलेलं स्वप्न पूर्ण केलं आहे. हे स्वप्न म्हणजे तिला पहिल्यांदाच विमान प्रवास करवून दिला आहे. स्वतःचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना आईच्या डोळ्यांत आलेलं आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर दिसणारा अभिमान यामुळे हा व्हिडिओ अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे.
इंस्टाग्राम अकाउंट @manishh_mk_ वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओनुसार, मनीषने आपल्या आईला पहिल्यांदाच हवाई प्रवासाचा अनुभव देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबात विमान प्रवास करणारी ती पहिली महिला ठरलीये.
व्हिडिओची सुरुवात विमानात बसण्याच्या क्षणापासून होता. आई सीटवर बसताच तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आनंद स्पष्ट दिसतो. विमान उड्डाण घेत असताना आई खिडकीतून बाहेर पाहत आकाशाचा अनुभव घेताना दिसते.. त्याचवेळी विमानातील वातावरण, प्रवाशांची हालचाल आणि सेवा याकडे ती बारकाईने लक्ष देत असते.
व्हिडिओतील सर्वाधिक भावनिक क्षण तो आहे जेव्हा आई विमानात दिलेलं जेवण जेवताना कॅमेऱ्याकडे पाहून एक छान स्माईल देते. उड्डाणादरम्यान या मुलाची आई थोडी भावुकही झालेली दिसते. तिच्या डोळ्यांतून दिसणारा आनंद आणि मुलाबद्दलचा अभिमान हा क्षण या व्हिडीओला अधिक खास बनवतो.
व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्सने विविध कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी कमेंट करत, आईसाठी काहीपण, असं म्हटलंय. तर 'पालकांच्या स्वप्नांना पूर्ण करणx हीच खरी कमाई' असंही बऱ्याच जणांनी म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.