Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Elevator rescue viral video: लिफ्टमध्ये टेक्निकल बिघाडामुळे अडकलेल्या दोन मुलांना एका मुलीने प्रसंगावधान आणि धाडस दाखवत सुरक्षित बाहेर काढलं. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Elevator rescue viral video
Elevator rescue viral videoSAAM TV
Published On

सोशल मीडियावर सध्या एका मुलीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये असून तिच्या प्रसंगावधानामुळे दोन लहान मुलांचे प्राण वाचल्याचं समोर आलंय. लिफ्टमध्ये अचानक आलेल्या टेक्निकल बिघाडामुळे दोन मुलं आत अडकली होती. मात्र एका मुलीने धाडस आणि शांतता राखत त्यांना सुरक्षित बाहेर काढलंय. या घटनेचा व्हिडिओ लिफ्टमधील सीसीटीव्हीत कैद झाला असून तिचं कौतुक होतंय.

मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही मुलं लिफ्टमध्ये जात असतात. यावेळी दोन मुलं आधीच लिफ्टमध्ये जातात. त्याच वेळी एक मुलीने लिफ्टचे दार पायाने थांबवून ठेवलेलं असतं. अचानक लिफ्टचं दार बंद होऊ लागतं आणि मुलं आतमध्येच अडकतात.

Elevator rescue viral video
Viral Video: टर्न घेताना महिला रायडरचा ताबा सुटला, बाईक थेट खड्ड्यात; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

हा व्हिडीओ पाहताना तुमच्याही अंगावर काटा उभा राहिल. दरम्यान ही परिस्थिती गंभीर होत असतानाही ती मुलगी घाबरत नाही. ती तत्काळ प्रसंगावधान दाखवत आपला पाय लिफ्टच्या दरवाज्यात अडकवून ते पूर्णपणे बंद होऊ देत नाही.

टेक्निकल बिघाडामुळे लिफ्टचं दार उघडत नसतानाही मुलगी हार मानत नाही. ती मदतीसाठी इतरांना जोरजोरात ओलरडून. मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे घटनास्थळी धाव घेतात आणि लिफ्टचं दार पकडून ठेवतात. त्यानंतर मुलगी एकामागून एक दोन्ही मुलांना बाहेर काढते.

Elevator rescue viral video
Couple Viral Video : पुण्यात धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे, मुलगी पेट्रोल टाकीवर बसली अन्.... प्रेमीयुगुलांचे प्रेम उतू

लिफ्टच्या कॅमेरात कैद झाली घटना

ही संपूर्ण घटना लिफ्टमधील कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला सुमारे दोन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळालेत. अनेक युजर्सने कमेंट्स करत मुलीच्या धाडसाचं कौतुक केलंय.

Elevator rescue viral video
Viral Video : तुला आम्ही काय कमी केलं? मुलगी गुपचूप मंदिरात लग्न करत होती, तितक्यात आई-बाप पोहचले, अन्...

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com