सांगलीत पेट्रोलची विहीर सापडलीय...या पाईपलाईनमधून बघा, पेट्रोल सदृश पाणी बाहेर येतंय...पेट्रोलची विहीर सापडल्याचा दावा केल्यानं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय...काडीपेटी ओढताच भडका उडाल्याचाही दावा करण्यात आलाय...ही आग यामुळेच लागलीय...सध्या पेट्रोलचे दरही वाढलेयत...त्यामुळे राज्यात जर पेट्रोलची विहीर सापडली तर पेट्रोल स्वस्त होणार का...? असेही प्रश्न उपस्थित केले जातायत...
सांगलीतील जतमधील उमदीत एका शेतकऱ्याच्या विहिरीतून पाण्याबरोबर चक्क पेट्रोलसदृश्य द्रव बाहेर येतंय...या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय...उमदी येथील दुंडाप्पा माळी यांच्या विहिरीच्या पाण्यात गेल्या वर्षभरापासून पेट्रोलसदृश्य वास येत असल्याचे सांगण्यात येतंय...मात्र, पाण्यावर पेट्रोलसदृश्य पदार्थ स्पष्टपणे दिसून येत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं. विहिरीतील पाणी शेतात सोडण्यात आले असता, त्या पाण्याच्या ठिकाणी काडीपेटी ओढल्यावर आग लागल्याचा दावा ग्रामस्थांनी केला...
या घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांनी विहिरीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान विहिरीच्या पाण्यात पेट्रोलसदृश्य उग्र वास येत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं...पण, पेट्रोल पंपातून काही प्रकारचे पेट्रोल किंवा इंधन गळती होऊन ते विहिरीच्या पाण्यात मिसळलंय का? याबाबत चौकशी सुरू करण्यात आलीय...
विहिरीतील पाण्यात पेट्रोलसदृश्य पदार्थ आढळला
नक्की हे काय आहे याचा तपास सुरू
बाजूच्या पेट्रोलपंपातून पेट्रोल आल्याची शंका
पाण्याची शास्त्रीय तपासणी केली जातेय
विहिरीतील पाण्यात हा कोणता पदार्थ आढळलाय...याची आता तपासणी केली जातेय..प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून वरिष्ठ पथक घटनास्थळी पाठवून सखोल पाहणी केली जातेय...विहिरीच्या पाण्यात पेट्रोलसदृश्य पदार्थ आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झालीय...पण, हा नक्की काय पदार्थ आहे...? हे पेट्रोल आहे का...? हे स्पष्ट झालेलं नाही...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.