

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट करणं हे दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. अशाच एका धोकादायक प्रयत्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. धावत्या रेल्वेतून बाहेर वाकून रील बनवण्याचा प्रयत्न करत असताना एका तरुणाचा रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या खांबाला जोरदार धक्का बसल्याचा हा व्हिडिओ आहे. या अपघातामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा सुरक्षिततेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
इन्स्टाग्रामवर Krishnachnad Nishad या युजरने हा व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये एक तरुण ट्रेनच्या डब्याच्या दरवाजाजवळ उभा राहिलेला दिसतो. त्याचा मित्र डब्याच्या आत उभा राहून मोबाईलवर त्याचा व्हिडिओ शूट करत असतो. रीलसाठी चांगला शॉट मिळावा म्हणून हा तरुण ट्रेनच्या बाहेर वाकलेला दिसतो.
व्हिडिओमध्ये पुढे दिसतं की, आणखी एखादी ट्रेन समोरून येत नाही ना हे पाहण्यासाठी तो क्षणभर आजूबाजूला पाहतो. मात्र या घाईत त्याचं लक्ष रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या खांबांकडे जात नाही. काही सेकंदांतच तो थोडा अजून बाहेर त्याचं शरीर झुकवतोआणि अचानक त्याचं डोकं रुळांच्या कडेला असलेल्या एका खांबाला जोरात धडकतं. धक्का इतका जोरदार असतो की तो क्षणात ट्रेनमधून खाली कोसळतो.
या घटनेनंतर व्हिडिओ अचानक थांबतो, त्यामुळे त्या तरुणाची पुढील स्थिती काय झाली किंवा त्याला किती दुखापत झाली याबद्दल स्पष्ट माहिती मिळत नाही. मात्र व्हिडिओमध्ये दिसणारी धडक ही इतकी तीव्र असते की तुमच्याही अंगावर काटा येईल.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून अनेक युजर्सनी यावर चिंता व्यक्त केलीये. काहींनी धोकादायक स्टंट करण्याबाबत तरुणांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. 'फक्त काही सेकंदांच्या व्हिडिओसाठी जीव धोक्यात घालणं योग्य नाही,' अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.