Mother and Son Viral Video: आईचा मेकअप पाहून पोरानं ओळखलंच नाही; रडून रडून पार्लर घेतलं डोक्यावर

Viral Video on Social Media: सोशल मीडियावर सध्या एका आई आणि मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसणार.
Mother and Son Viral Video
Mother and Son Viral VideoSaam Tv
Published On

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका आई आणि मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसणार. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये महिलेने इतका मेकअप केला की तिला मुलगा ओळखण्यास नकार देत आहे. एवढेच नाही तर हा मुलगा माझी आई कुठे आहे असं विचारत पार्लरमधेच जोरजोरात रडत आहे. या व्हिडीओवर आता नेटकरी देखील आपल्या भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. (Latest Marathi News)

Mother and Son Viral Video
Pune Special Report: पुण्याची ओळख कोण बदलतंय? पुण्यात कोट्यवधींचं ड्रग्स येतंय कुठून, वाचा सविस्तर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही सोफ्यावर बसून एक मुलगा जोरजोरात रडताना दिसत आहे. दरम्यान, त्याची आई त्याला शांत करण्यासाठी येते. पण तो आईलाच ओळखण्यास नकार देतो. ही आपली आई नसून दुसरी कोणीतरी महिला आहे असे त्याला वाटले आणि तो तिलाच माझी आई कुठे आहे असे विचारत रडू आहे. व्हिडिओ दुसरी महिला हीच तुझी आई आहे असं मुलाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मुलगा काहीही ऐकण्यास तयार नाही. 

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. इन्स्टाग्रामवर @visagesalon1 नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला (Viral News) लाईक केले आहे.

मेकअप केल्यामुळे मुलगा त्याच्या आईला ओळखू शकत नाही असं एका युजरने म्हटलं. व्हिडिओवर एका महिलेने कमेंट करत लिहिलं आहे की, बेटा, प्रत्येक वेळी आईला भूत बनवून ठेवणार का कधीतरी तिला परी बनायला दे. तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, हा मुलगा आता इतका रडतो तर त्याच्या बायकोला पाहून किती रडेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com