Pune Special Report: पुण्याची ओळख कोण बदलतंय? पुण्यात कोट्यवधींचं ड्रग्स येतंय कुठून, वाचा सविस्तर

Pune News: पुणे शहरातच सध्या अंमली पदार्थांच्या तस्करीत सुळसुळाट सुरू आहे.
Pune Special Report
Pune Special ReportSaam Tv
Published On

अक्षय बडवे

Pune News Today: शांत, सुरक्षित आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. मात्र, या शहराच्या ओळखीला अलीकडे गालबोट लागू लागले आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

त्यात अंमली पदार्थच्या विक्रीचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. नुकत्याच कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत पुण्यात तब्बल ५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. पुण्यात नेमके हे ड्रग्स येतात तरी कुठून हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

Pune Special Report
Sanjay Raut On Pankaja Munde: परिणाम काय होतील, याची पर्वा न करता निर्णय घ्या; संजय राऊतांचा पंकजा मुंडेंना सल्ला

पुण्यात (Pune) गेल्या 15 दिवसात सातत्याने अंमली पदार्थांचा साठा जप्त होत असल्यांने पोलिसांचीही चिंता वाढली आहे. पुणे शहरात सध्या अंमली पदार्थांच्या तस्करीचा सुळसुळाट सुरू आहे. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून गेल्या 5 महिन्यात 7 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. कोकेन, गांजा, एमडी असे अनेक अंमली पदार्थ पुण्यातील विविध भागात तस्करी होत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. (Pune News)

जप्त केलेले अमली पदार्थ आणि त्याची किंमत (जानेवारी ते १९ मे)

कोकेन: ३९,७५,००० रुपये

गांजा: ३६,९३,१६० रुपये

हेरॉईन: ४०,३३,२०० रुपये

अफिम ची बोंडे: ७६,०५० रुपये

चरस: ४२,६८,९४० रुपये

एम डी: ३,४३,७९,४०० रुपये

हशिष: ३,९०,००० रुपये

कॅथा इडुलीस: ७,०१,३५० रुपये

इतर ड्रग्स: २ कोटी हून अधिक रुपये

एकूण रक्कम: ७,००,००,०००

Pune Special Report
Shivrajyabhishek Sohala 2023 : शिवराज्याभिषेक सोहळयात यंदा 'या' कार्यक्रमांचे आयाेजन; शिरकाई देवी परिसर हर हर महादेवने दुमदुमला

आज हजारो लोक पुण्यात शिक्षणासाठी, व्याव्यायासाठी पुण्यात येत असतात. गेल्या काही महिन्यांपासून अमली पदार्थांच्या तस्करीत मात्र तरुण पिढी अग्रेसर दिसते आहे. ४,५ दिवसांपूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक थक्क करणारी बाब समोर आली. उच्चभ्रू तरुण तरुणी, परराज्यातून शिक्षणासाठी आलेले तरुण, अधिक पैसा हातात असणारे स्थानिक, बांधकामाच्या कामासाठी येणारा अल्पशिक्षित वर्ग अशा सर्वांना व्यसनाला लावण्याचे प्रलोभन वाढत चालली आहेत.

खिशात सहजपणे उपलब्ध झालेला पैसा आणि घरच्यांपासून लांब राहत असलेली ही तरुण मंडळी बेफाम होत चालली आहे. वेळीच यांना आवर घातला नाही तर पुण्याची लौकीकता ढासाळायला वेळ लागणार नाही. शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असलेले हे शहर ड्रग्सच्या विळख्यात अडकत चाललं हे मात्र कटू सत्य आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com