Badlapur Local Fight: लोकलमध्ये चढण्यावरुन वाद; बदलापूर स्टेशनवर प्रवाशांची हाणामारी

Passengers Fight At Badlapur Station: सोशल मीडियावर सध्या बदलापूर रेल्वे स्टेशनवर घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे असलेल्या दोन प्रवाशांमध्ये लोकलमध्ये चढण्यावरुन जोरदार हाणामारी झाली आहे.
Passengers Fight At Badlapur Station
Badlapur Local FightSaam Tv
Published On

Local Train Passenger Clash: बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळी गर्दीच्या वेळेत दोन प्रवाशांमध्ये लोकलमध्ये चढण्यावरून जोरदार हाणामारी झाली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अलीकडेच लोकलमधून पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार समोर आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ट्रेनमध्ये चढण्यावरुन वाद विकोपाला

नेहमी प्रमाणे सकाळी प्रवाशांची गर्दी बदलापूर स्टेशनवर जमली होती. कोणी ट्रेन पकडण्यासाठी पळापळ करते होते तर काही प्रवासी ट्रेनची वाट पाहत उभे होते. दरम्यान, गर्दीच्या वेळेत बदलापूर स्थानकावर ट्रेन आली आहे आणि लोकल ट्रेनमध्ये चढण्यावरुन दोन पुरुष प्रवाशांमध्ये वाद झाला. पाहता पाहता हा वाद स्टेशनवर तुफान हाणामारीत(Passenger Fight) बदलला.

वाद सुरु होताच प्लॅटफॉर्मवर असलेल्या काही प्रवाशांनी हा प्रकार शांत करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील ट्रेनमध्ये चढण्याचे सोडून दोन प्रवाशी पुन्हा एकदा एकमेंकाना मारु लागले. एकीकडे लोकलमध्ये चढण्याचा काही प्रवासी प्रयत्न करत आहेत तर दुसऱ्या बाजूला या दोन प्रवाशांची हाणामारी सुरु होती. या सर्वांमुळे काही वेळ प्लॅटफॉर्मवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

बदलापूर स्टेशनवरील हा प्रकार ज्या प्लॅटफॉर्मवर घडला तेथील काहींनी तात्काळ मोबाईलमध्ये हाणामारी कैद केला आणि सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरलही केला. या घटनेनंतर लोकलमध्ये(Mumbai Local Train) चढण्यावरून हा वाद झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

टीप: रेल्वे स्टेशनवरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Passengers Fight At Badlapur Station
Mumbai Local Train Video: अर्रर्र! मुंबई लोकलमध्ये महिला आणि किन्नरमध्ये जोरदार हाणामारी; एकमेंकीना धू धू धूतले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com