Viral Video: वरातीत नाचताना आयफोन गटारात पडला; पठ्ठ्या थेट घाण पाण्यात उतरला; पाहा व्हिडिओ

iPhone 17 Pro viral video: उत्तर प्रदेशातील औरैयामध्ये लग्न समारंभात आयफोन 17 प्रो नाल्यात पडल्याने तरुणाने थेट नाल्यात उडी मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
iPhone 17 Pro viral video
iPhone 17 Pro viral videosaam tv
Published On

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका लग्न समारंभात घडलेली अनपेक्षित घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. वरातीत नाचताना आणि सेल्फी घेत असलेल्या एका तरूणाचा महागडा आयफोन 17 प्रो नाल्यात पडला. त्यानंतर फोन परत मिळवण्यासाठी युवकाने कोणताही मागचा पुढचा विचान न करता थेट नाल्यात उडी घेतली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून युजर्सने त्यावर विविध कमेंट्स केल्यात.

कुठे घडली ही घटना?

ही घटना औरैया जिल्ह्यातील सदर कोतवाली परिसरातील तकिया चौकमध्ये घडली. कानपूरहून आलेल्या वरातीत सहभागी झालेला तरूण आपल्या मित्रांसोबत आनंदात सेल्फी घेत होता. याच दरम्यान त्याचा तोल गेला आणि त्याच्या हातातील आयफोन 17 प्रो थेट बाजूच्या नाल्यात पडला. फोन पडताच युवक घाबरला आणि क्षणाचाही विलंब न करता तो नाल्यात उतरला.

iPhone 17 Pro viral video
Viral video: रस्त्यावर स्टंट करणं पडलं महागात, धावत्या बसने तरुणाला दिली धडक; फुटबॉलसारखा उडून पडला, VIDEO समोर

हा फोन तरूणाच्या त्याच दिवशी कुटुंबातील लग्नाच्या निमित्ताने खरेदी केला होता. त्यामुळे फोन हरवणं हा त्याच्यासाठी मोठा धक्का होता. तो बराच वेळ नाल्यात उतरून फोन शोधण्याचा प्रयत्न करत होता. मात्र नाल्यातील घाण आणि पाण्याचा वेग यामुळे त्याला फोन शोघूनही सापडला नाही.

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तरूण नाल्यात उतरून फोन शोधताना दिसतोय. तर बाहेर उभे असलेले नातेवाईक टॉर्चच्या मदतीने त्याला मदत करताना दिसतात.

iPhone 17 Pro viral video
Social media viral: रेल्वे स्टेशनवर खोटा साप घेऊन फिरला तरुण, प्रवाशांची उडाली धांदल; VIDEO होतोय व्हायरल

युजर्सच्या विविध कमेंट्स

युजर्सने या घटनेवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तरूणाच्या धाडसाचं कौतुक केलंय. तर काहींनी 'एका फोनसाठी एवढा धोका घेणं योग्य नाही' असं म्हटलंय. एका युजरने लिहिलंय, 'फोन पुन्हा मिळू शकतो, पण जीव नाही', असंही काही युजरने म्हटलंय.

iPhone 17 Pro viral video
Angry Bull Attack: १,२ नव्हे ३ वेळा, रस्त्यावरच ट्रॅक्टरला जोरात बैलाने धडक दिली, ट्रक्टरचा चेंदामेंदा झाला, थरारक व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com