

सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडीओ वेगाने व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये काही तरुणांनी धावत्या बससमोर स्टंट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून गंभीर अपघात घडल्याचं कॅमेरात कैद झालं आहे. या घटनेत एका तरुणाला बसची जोरदार धडक बसल्याचं तुम्ही पाहू शकता. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावरील धोकादायक ट्रेंड्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तीन तरुण बाईकवर बसलेले दिसतात. ते काहीतरी स्टंट करण्याच्या तयारीत असल्याचंही दिसतंय. काही क्षणांनी बाईक रस्त्याच्या कडेला थांबवली जाते आणि त्यातील दोन तरुण अचानक रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला जातात. यावेळी समोरून एक बस वेगाने येताना दिसते.
हा स्टंट असा होता की, बस येत असताना त्या दोन तरुणांनी रस्ता ओलांडून ती बस थांबवण्याचा प्रयत्न करायचा होता. मात्र, हा प्रयत्न अत्यंत धोकादायक ठरतो. बस चालकाला वेळेवर ब्रेक लावता येत नाही आणि बस थेट एका तरुणाला जोरात धडक देते. धडकेनंतर तो तरुण हवेत उडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकला जातो.
व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की, अपघातानंतर त्या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याचं दिसून येतंय. त्या मुलाला पडताना पाहताच आसपासच्या लोकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. मात्र जखमीची पुढील स्थिती काय आहे याबाबत माहिती मिळालेली नाही.
या व्हिडीओवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. अनेकांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. 'फक्त व्ह्यूज आणि लाईक्ससाठी लोक आपला जीव धोक्यात घालत आहेत,' असं एका यूजरने म्हटलंय. तर दुसऱ्या एका युजरने, 'अशा स्टंट्सवर कडक कारवाई झाली पाहिजे,' असं मत व्यक्त केलंय.
(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.