

सोशल मीडियावर आजकाल अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ गमतीशीर असतात, तर काही व्हिडीओ गंभीर अपघाताचे असतात. सध्या असाच एक प्रँक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये एक तरुण रेल्वे प्लॅटफॉर्मवर दोरीला बांधलेला खेळण्याचा साप ओढत चालताना दिसतो आहे.
हा प्रकार पाहताच स्टेशनवर उपस्थित प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाल्याचे दिसतो आहे. सापाला पाहताच भीतीपोटी अनेकजण किंचाळून पळायलाही लागले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Nalanda_index या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओनुसार हा प्रकार उत्तर प्रदेशातील मथुरा रेल्वे स्टेशनवरील आहे. संबंधित तरुणाने खेळण्याचा साप दोरीने बांधून तो मागे ओढत प्लॅटफॉर्मवर फिरण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही लोकांना हा साप खरा वाटल्याने त्यांनी घाबरून पळ काढला. काही क्षणांतच प्लॅटफॉर्मवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांच्या आरडाओरडीत काही काळासाठी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसून आले.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच काही युजर्सने संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या प्रकाराला 'अत्यंत बेजबाबदार आणि धोकादायक' असे म्हटले आहे. एका यूजरने कमेंट करताना म्हटले आहे की, 'ही काही मस्करी नाही, तर हा लोकांच्या जीवाशी खेळ आहे.' अजून एका व्यक्तीने कमेंट करताना लिहिले आहे की, 'रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारांमुळे मोठी दुर्घटना घडू शकते.'
काही सोशल मीडिया युजर्सने या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी रेल्वे पोलीस आणि रेल्वे मंत्रालयाला टॅग करून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ञांच्या मते, असे प्रँक व्हिडिओ वाढत असून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे घातक ठरू शकते.
(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.