VIRAL VIDEO : बाबोSSS...दुबईतील शाळांची फी किती? विद्यार्थीनीच्या आईने सांगितला अविश्वसनीय आकडा, बघून डोळे पडतील पांढरेफट्ट

Dubai School Fee : दुबईतील आलिशान जीवनशैलीसोबतच तिथल्या शिक्षणाचा खर्चही महाग आहे.एका आईने सोशल मीडियावर आपल्या मुलीच्या शाळेची फिसकटलीस आणि युनिफॉर्मचा संपूर्ण हिशोब मांडला आहे. ज्याचा खर्च लाखांच्या घरात आहे.हा हिशोब ऐकताच नेटकऱ्यांचा यावर विश्वासच बसत नाही आहे. यामुळे नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे.
VIRAL VIDEO : बाबोSSS...दुबईतील शाळांची फी किती? विद्यार्थीनीच्या आईने सांगितला अविश्वसनीय आकडा, बघून डोळे पडतील पांढरेफट्ट
VIRAL VIDEO : बाबोSSS...दुबईतील शाळांची फी किती? विद्यार्थीनीच्या आईने सांगितला अविश्वसनीय आकडा, बघून डोळे पडतील पांढरेफट्टmeta ai
Published On

दुबई म्हटलं की आलिशान गाड्या,मोठमोठ्या इमारती आणि महागड राहणीमान डोळ्यासमोर येत. पण तुम्हाला दुबईत शिकणाऱ्या शाळेतल्या मुलांची फी किती असेल याचा पुसटचा अंदाज तरी आहे का ? एका आईने आपल्या मुलीच्या शाळेचा खर्च सोशल मीडियावर मांडला तो ऐकून भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळालं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होत आहे.

चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी व्हेरोनिका प्रश्न आणि उत्तरे हा सोशल मीडियावरील एक छोटासा खेळ खेळत होती. त्यात या मुलीच्या आईला जेव्हा शाळेतल्या फी बद्दल विचारले गेले, तेव्हा तिने चक्क हिशोबच मांडला. तिची मुलगी दुबईत इंटरनॅशनल शाळेत शिकते. सुरुवातीला अॅसेंसमेंट फीसाठी 525 दिरहम म्हणजे भारतीय चलनानुसार 13 हजार रूपये द्यावे लागतात.त्या सोबतच वार्षिक ट्युशन फी 55 हजार दिरहम आहे म्हणजेच तब्बल 14.34 लाख भरावी लागते.

VIRAL VIDEO : बाबोSSS...दुबईतील शाळांची फी किती? विद्यार्थीनीच्या आईने सांगितला अविश्वसनीय आकडा, बघून डोळे पडतील पांढरेफट्ट
Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

याशिवाय मुलीला शाळेतून येण्या- जाण्यासाठी स्कूल बसची सुविधा आहे. त्यासाठी वर्षाला 12 हजार दिरहम म्हणजेच 3.12 लाखांचा खर्च आहे. तसेच युनिफॉर्मसाठी 1000 दिरहम म्हणजे 26,000 रूपये इतका खर्च येतो. महिन्याला मुलीच्या शाळेचा खर्च हा जवळपास 30 लाखांच्या घरात जातो. त्यात खाणपिणं, इतर अॅक्टिव्हिटीज, पुस्तके यांचा खर्च वेगळाच असतो.

VIRAL VIDEO : बाबोSSS...दुबईतील शाळांची फी किती? विद्यार्थीनीच्या आईने सांगितला अविश्वसनीय आकडा, बघून डोळे पडतील पांढरेफट्ट
VIRAL VIDEO : पायातली चप्पल हरवली, पठ्ठ्याच्या डोक्यात ट्यूब पेटली; हजारोंच्या ढिगाऱ्यातून ChatGPT ने शोधून काढली, कशी? पाहा व्हायरल व्हिडिओ

व्हेरोनिकाने हा संपूर्ण खर्च सोशल मीडियावर जेव्हा शेअर केला. तेव्हा नेटकरी इतकी फि ऐकून अवाक झाले. कोणी तुलना करत ही विद्यापीठाची फी आहे की शाळेची?...अशी गंमतीशीर कमेंट केली,तर कोणी यापेक्षा भारताचे शिक्षण बरे अशी कमेंट केली. तर काहींनी दुबईत यापेक्षा स्वस्त शाळा देखील आहे असा बोलून वाद मिटवला.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com