अलिकडच्या काळात प्राण्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. भटक्या कुत्र्यांनी, मोकाट गाई किंवा बैलाने रस्त्यावरील नागरिकांवर जीवघेणे हल्ले केल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील, मात्र दिल्लीमधून एक भयंकर आणि क्रुर घटना समोर आली आहे.
शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या अंगावर पीटबुल सोडल्याची घटना घडली. या कुत्र्याने महिलेच्या शरिराचे लचके तोडले अन् शेजारी फक्त बघत होते. या भयानक घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सविस्तर माहितीनुसार, दिल्लीमधील (Delhi) स्वरूप नगर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. शेजारच्या कुटुंबातील एक महिला घरासमोर शौच करण्यासाठी तिच्या पिटबुल कुत्र्याला घेऊन गेली. यावेळी संबंधित घरातील महिलेने तिला हटकल्याने हे संपूर्ण प्रकरण घडले.
कुत्र्याला घरासमोर शौचास आणल्याने रिया नावाची महिला शेजारच्या महिलेकडे तक्रार करायला गेली होती. यावेळी दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. यावेळी महिलेच्या हातातील पिटबुलने तक्रार केलेल्या महिलेवर हल्ला चढवला, मात्र त्या महिलेच्या मुलाने पहिल्यांदा कुत्र्याला उचलून घरात घेवून गेला.
मात्र काही वेळाने वाद वाढल्यानंतर त्या मुलाने मुद्दाम त्या पिटबुलला महिलेच्या अंगावर सोडले. कुत्र्याने महिलेच्या हात आणि पायांसह शरीरावर पाच वेळा चावा घेतला. आरडा- ओरडा ऐकून काही इतर शेजारी बाहेर आल्यानंतर त्यांनी कुत्र्यापासून महिलेले वाचवले. ही भयंकर घटना सिसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, पीटबुल महिलेच्या शरिराचे लचके तोडताना दिसत आहे तर इतर लोक फक्त बघत उभे राहिले आहेत. थरकाप उडवणारा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी, स्वरुपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सिसिटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारे पोलीस तपास करत आहेत. या तक्रारीमध्ये कुत्र्याला मुद्दाम आपल्या अंगावर सोडल्याचे म्हणले आहे. (Viral Video News In Marathi)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.