एखादी कला शिकायची असो वा घेणे असो याला आता वयाची मर्यादा राहिलीली नाही. वयाची बंधन जुगारुन मनमोकळे जीवनाचा आनंद लुटणारे आपल्याला हल्ली अनेकजण पाहायला मिळतात. पण एक काळ असा होता जिथं तरुणंच त्या प्रसंगाचा असो वा गोष्टीचा आनंद ,अनुभव घेण्यासाठी योग्य समजला जायचा. पण काळानुसार काही गोष्टीमागे पडल्या आहेत... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आपल्याला सध्या सोशल मीडिया आणि आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अशा काही गोष्टी पाहायला मिळतात. ज्यामुळे एक सुखद अनुभव कायमचा लक्षात राहतो. खास करुन आपल्या वयापेक्षा अधिकचा व्यक्ती त्यांची काही कला दाखवत असतील तर ते पाहण्यासाठी आपण खास तिथे थांबून ते पाहतो. एखादा कार्यक्रम आला की,धागड धिगांना आणि डान्स करणारे असतातच. मग सोशल मीडियावर कधी एखाद्या कार्यक्रमातील जोडप्यांच्या डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या अशातच सोशल मीडियावर एका कपल्सचा कार्यक्रमातील डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, सदर व्हिडिओ एका कार्यक्रमातील आहे. यामध्ये चॉकलेटी रगांच्या साडीतील महिला आणि पिवळ्या रगांच्या कुर्तामधील व्यक्ती हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांना तोडीच तोड साथ देत आहेत. त्या पुरुषापेक्षा महिला एकदम उत्तमपणे डान्स करत आहे.
व्हायरल व्हिडिओ@veena_negi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. नेमका हा व्हिडिओ कुठला आहे हे समजले नाही. धम्माकेदार डान्सचा व्हिडिओ तेथील उपस्थित असलेल्या व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. 'दिल तेरा आशिक' या हिंदी गाण्यावर दोघे डान्स करत आहे.
व्हायरल व्हिडिओला मोठ्या नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. तसंच या व्हिडिओला हजारोंच्या घरात व्हूज आले आहेत. एका यूजर्सने लिहीलय की,'याला म्हणतात खरे प्रेम' आणखी एकाने लिहील आहे की, आजच्या दिवसातील मस्त व्हिडिओ'.आपल्याला जेव्हा आवडीचा जोडीदार मिळतो तेव्हा अशाच पद्धतीने डान्स करताना आनंद व्यक्त होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.