हर्षदा सोनोने
अकोला : कुठल्याही आईला वाटेल त्यांच्या मुलाचं कर्तृत्व आहे, त्यांना संधी मिळावी. यामुळे आपल्या मुलाबद्दल भावना व्यक्त करणं यात काही गैर नाही. (Ajit Pawar) अजित पवारांच्या आईने अजित पवार मुख्यमंत्री व्हावं; अशी भावना व्यक्त केली होती. त्यावर बोलताना (Radhakrishna Vikhe Patil) राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Live Marathi News)
अकोला येथे आले असता राधाकृष्णा विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मत मांडले आहे. सुनील तटकरे यांची खासदारकी रद्द करावी; अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली होती, यावर बोलताना ज्यांनी जनाधार गमावला, पक्ष गमावला अश्या लोकांच्या (Akola) विधानाला फार महत्व देण्याची गरज नाही; असा टोला विखे पाटील यांनी लागवला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्या घटनेत गुंडा एलिमेंट
बीडच्या घटनेत गुंडा एलिमेंट जास्त होता; असे विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. बीडच्या घटनेची चौकशी सरकारने सुरू केली आहे. सामान्य नागरिक आणि आमदारांच्या मालमत्तांचे नुकसान झाले होते. जाळपोळ करून, जीवघेणे हल्ले करून असे आरक्षण मिळतात का? असा सवालही विखे पाटील यांनी केला. जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने मागणी केली आहे. त्याला आमचा सुद्धा पाठिंबा आहे. आरक्षण मिळण्याबद्दल कोणाचा विरोध नाही; अशी स्पष्ट मत, विखे पाटील यांनी मांडलं.
एक्स्पोर्ट ड्युटी वाढवण्याचा निर्णय डिमांड आणि सप्लायवर अवलंबून असतो. असे निर्णय अनेकवेळा घ्यावे लागतात. उत्पादन कमी असलं तर शासन सामान्य नागरिकांची काळजी करतो. शासन उत्पादन करत नाही. अस स्पष्टीकरण विखे पाटलांनी केंद्र शासनाने निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये कांदा वितरित सुरू केल्याच्या प्रश्नावर बोलत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.