Ravikant Tupkar News: संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करा: सोयाबीन, कापूस प्रश्नावर रविकांत तुपकरांची एल्गार रथ यात्रा

Buldhana News : संपूर्ण राज्य दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे. सरकार शेतकऱ्याच्या जीवावर उठले आहे
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSaam tv
Published On

संजय जाधव
बुलढाणा
: राज्यात अगोदरच पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय आता सोयाबीन व कापसाला (Cotton) अपेक्षित दर मिळालेला नाही. तर राज्य सरकारने ४० तालुक्यातच दुष्काळ घोषित केला असून, संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करावा. तसेच कापूस व सोयाबीनला चांगला दर मिळावा; या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Ravikant Tupkar) रविकांत तुपकर यांनी एल्गार रथ यात्रा काढली आहे. (Breaking Marathi News)

Ravikant Tupkar
Nandurbar News : जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती; दुष्काळी परिस्थितीमुळे दरातही वाढ

राज्यातील शेतकरी (Farmer) दुष्काळाच्या छायेत असताना सरकारने ४० तालुक्यात दुष्काळ घोषित केला आहे. बाकी ठिकाणी धरणे ओसंडून वाहत आहेत का? असा प्रश्न रविकांत तुपकर यांनी उपस्थित करत एल्गार यात्रेला सुरुवात केली आहे. संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन सरकारला सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना तुपकरांनी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ravikant Tupkar
Grampanchayat Election 2023: शिंदखेडा तालुक्यातील मतदान केंद्रावर गोंधळ; चिन्ह असलेली चिठ्ठी आणल्याचा आक्षेप

सोयाबीन, कापूसला भाव नाही. खरीप हातातून गेले आहे, रब्बीपण हातात राहिले नाही. अश्या परिस्थितीत संपूर्ण राज्य दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे. सरकार शेतकऱ्याच्या जीवावर उठले आहे. आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारला झोपेतून उठवून जागे करण्यासाठी ही एल्गार यात्रा काढली आहे. ही एल्गार यात्रा जिल्ह्यातून जात २० तारखेला बुढाण्यात मोठ्या भव्यमोर्च्यात समावेश होईल; अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com