Maharashtra Government Declares Drought : 'दुष्काळ जाहीर करा अन्यथा सरकारला न्यायालयात खेचणार'; नेते मंडळी आक्रमक (पाहा व्हिडिओ)

राज्यात केवळ 40 तालुक्यात दुष्काळ घोषित केल्याने नेते मंडळी आक्रमक झाली आहेत.
declare drought in maharashtra
declare drought in maharashtrasaam tv
Published On

- डाॅ. माधव सावरगावे / संजय जाधव / अभिजीत साेनवणे

Ravikant Tupkar News : संपूर्ण राज्यात दुष्काळ असताना राज्य सरकारकडून (maharashtra government) केवळ 40 तालुक्यात दुष्काळाची (drought in 40 taluka of maharashtra) घोषणा केली. हे आम्हांला मान्य नसल्याचे सांगत राज्य सरकाराने संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केली आहे. (Maharashtra News)

declare drought in maharashtra
Sakal Maratha Samaj Andolan : मराठ्यांचा राज्यभरात रास्ता राेकाे, वाहतुक ठप्प; महामार्गांवर प्रवाशांचे हाल

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळाच्या यादीवरून मराठवाड्यातील शेतकरी आता पुन्हा संतापलेत. मराठवाड्यात सर्वत्र भीषण स्थिती असतानाही 76 पैकी केवळ 14 तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्याने सरकारला पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवायच्या आहेत का?, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जगू द्यायचे नाही का असा सवाल उपस्थित केला जातोय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हे दुष्काळाचे नावे कोणत्या आधारावर जाहीर केले, जाहीर केलेल्या त्या तालुक्याच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या तालुक्याची स्थिती का विचारात घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. प्रत्यक्ष पाहणी न करता टेबलावर बसून कागदावर टिपलेला हा दुष्काळ असल्याची चर्चा आता सुरू झालीय.

declare drought in maharashtra
Maratha Andolan In New Delhi : 'एक मराठा लाख मराठा', मराठ्यांनी दणाणून साेडले जंतर-मंतर

... अन्यथा न्यायालयात जाणार : आमदार सुहास कांदे

रविकांत तुपकर यांच्या प्रमाणे आमदार सुहास कांदे (mla suhas kande) यांनी देखील पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली आहे. सरकारने नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर केला नाही तर केंद्र आणि राज्य सरकार विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा आमदार कांदे यांनी दिला आहे.

येवल्यापेक्षा नांदगांवमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याचा दावा कांदेंनी केला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांचा मालेगाव, मंत्री छगन भुजबळ यांचा येवला आणि सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर झाला असून नांदगावसाठी लढा उभारणार असल्याचे कांदेंनी साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

declare drought in maharashtra
Nitesh Rane On Manoj Jarange : मनाेज जरांगे पाटलांची राजकीय भाषा सुरू : नितेश राणे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com