Krushi Seva Kendra : महाराष्ट्रातील कृषी सेवा केंद्र उद्यापासून राहणार बंद,परभणीकरांचा पाठींबा

Krushi Seva Kendra To Remain Closed In Maharashtra : अन्यायकारक कायदे विक्रेत्यांवर लादू नयेत अशी मागणी जाेर धरु लागली आहे.
krushi seva kendra to remain closed in maharashtra
krushi seva kendra to remain closed in maharashtrasaam tv
Published On

Parbhani News : महाराष्टासह परभणी जिल्हात उद्यापासून (गुरुवार, ता. 2) तीन दिवस कृषी दुकानदारांनी व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या प्रस्तावित विधेयकातील जाचक नियमांच्या विराेधात तसेच नवे (प्रस्तावित) कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी हा बंद असल्याचे विक्रेत्यांनी नमूद केले. (Maharashtra News)

krushi seva kendra to remain closed in maharashtra
Moong Market : मुगाच्या दरात तेजी तरीही शेतक-यांत नाराजी

कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी सध्या प्रचलित असलेले कायदे पुरेसे आहेत. तरी देखील राज्य शासनाने पुन्हा नवे कायदे तयार करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

krushi seva kendra to remain closed in maharashtra
Shivendraraje Bhosale : मराठ्यांचा आवाज कधीही दडपला जाणार नाही, हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे : शिवेंद्रसिंहराजे भाेसले

या प्रस्तावित कायद्यातील तरतुदी विक्रेत्यासाठी अत्यंत जाचक आहेत. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रीचा व्यवसाय करणे कठीण बनणार आहे. त्यामुळे अन्यायकारक कायदे विक्रेत्यावर लादू नयेत अशी मागणी करीत राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानूसार परभणी जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते उद्यापासून (गुरुवार ता. २) शनिवार ता. ४) पर्यंत दुकाने बंद ठेवणार आहोत. याबाबतची माहिती परभणी जिल्हा बियाणे, खते व कीटकनाशके अधिकृत विक्रेता महासंघाचे अध्यक्ष रमेश देशमुख आणि सचिव बाळासाहेब चोपडे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

krushi seva kendra to remain closed in maharashtra
Dhule News : तब्बल दहा दिवसानंतर नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागास यश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com