Pune Market Yard : पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड १ नोव्हेंबरला राहणार बंद

Maratha Andolan : मराठा आंदाेलकांना पाठींबा देण्यासाठी पुकारण्यात आला आहे बंद.
Pune Market Yard To Remain Closed On 1 November, Maratha Reservation
Pune Market Yard To Remain Closed On 1 November, Maratha Reservationsaam tv
Published On

- सचिन जाधव

Pune News : राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil latest marathi news) यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशन गुलटेकडीच्या वतीने बुधवारी (ता. 1 नोव्हेंबर) मार्केटयार्ड एक दिवसाकरिता बंद पुकारला आहे.(Maharashtra News)

Pune Market Yard To Remain Closed On 1 November, Maratha Reservation
Moong Market : मुगाच्या दरात तेजी तरीही शेतक-यांत नाराजी

या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मार्केटयार्ड मेन गेट नंबर १ येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तरी सर्व आडते बांधव व बाजार आवारातील सर्व घटक या बंद मध्ये सहभागी होणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान हडपसर सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हडपसर पंचकृषीतील मराठा समाजातील तब्बल ३ हजार नागरिक रस्त्यावरून उतरून मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी पायी मोर्चा काढला.

ससाणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्च्याला सुरवात करण्यात आली. पुढे हडपसर गाव गाडीतळ मार्गे सोलापूर रोड रवीदर्शन पासून गाडीतळ पीएमपीएल बस थांबा येथे शिस्तीत समारोप करण्यात आला. दरम्यान एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या.

Pune Market Yard To Remain Closed On 1 November, Maratha Reservation
Tadoba Online Booking : ताडोबा ऑनलाईन बुकिंगचा मार्ग माेकळा, उद्यापासून करा नाेंदणी; जाणून घ्या नवी वेबसाईट

यावेळी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा असल्याचे हात वर करून नागरिकांनी ताकद देण्याचे संकेत दिले.या मोर्चामध्ये तरुण, तरुणी, महिला,शालेय विद्यार्थिनी व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Pune Market Yard To Remain Closed On 1 November, Maratha Reservation
Sharmila Thackeray News : ...तर तुमची बायकाेच तुमचे लाेणचे करेल : शर्मिला ठाकरे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com