Sakal Maratha Samaj Andolan : मराठ्यांचा राज्यभरात रास्ता राेकाे, वाहतुक ठप्प; महामार्गांवर प्रवाशांचे हाल

राज्यातील ठिकठिकाणी आजही मराठा आंदाेलक रस्त्यावर उतरले आहेत.
mangaon traffic jam
mangaon traffic jamsaam tv
Published On

- साम टीव्हीच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून

Maratha Andolan News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आजही (गुरुवार) राज्यभरात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदाेलन सुरु आहे. माणगावात आंदाेलकांनी रास्ता राेकाे केल्याने मुंबई गाेवा राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहतुक ठप्प झाली आहे. याव्यतरिक्त नगर - कल्याण महामार्ग देखील आंदाेलकांनी राेखल्याने तेथील वाहनधारक वाहतुक काेंडीत सापडले आहेत. (Maharashtra News)

mangaon traffic jam
Shivpratishthan Hindustan : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

रायगड जिल्ह्यात सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. माणगावमध्ये शेकडो मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरले आहेत. या आंदाेलकांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन छेडले आहे.

mangaon traffic jam
Sambhaji Bhide On Maratha Arakshan : मराठा आरक्षणावर संभाजी भिडे स्पष्टच बोलले; म्हणाले, लबाड नेत्यांमुळं रखडलं...

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत. आंदाेलकांनी शिंदे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणुन महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदाेलनामुळे मुंबई गोवा महामार्गाची दुतर्फा वाहतुक ठप्प झाली आहे.

नगर - कल्याण महामार्गावर रास्ता रोको

सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर - कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन करण्यात आला. खातगाव टाकळी गावात आंदाेलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची त्वरित दखल घेण्याची मागणी आंदोलकांनी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आंदाेलनात विद्यार्थी देखील झाले सहभागी हाेते. सुमारे एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे नगर - कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

mangaon traffic jam
Shivendraraje Bhosale : मराठ्यांचा आवाज कधीही दडपला जाणार नाही, हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे : शिवेंद्रसिंहराजे भाेसले

हैद्राबाद दिल्ली राष्ट्रीय महामार्ग हिंगोलीत रोखला

मराठा समाजातील महिला आंदोलकांनी हैद्राबाद दिल्ली राष्ट्रीय महामार्ग रोखत मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्यावर मोठमोठे टायर पेटून वाहतूक रोखली. त्यामुळे दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

mangaon traffic jam
Success Story : ट्रकचालकाच्या मुलाची लंडनपर्यंत मजल, वाचा जय चाैधरीच्या जिद्दीची कहाणी

धाराशिवला जेलभराे आंदाेलन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांकडून जेलभरो आंदोलन करण्यात आले. धाराशिव तालुक्यातील कौडगाव येथे शेकडोंच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. यावेळी महिला आंदोलकांनी हातातील बांगड्या फोडून सरकारचा निषेध नाेंदविला.

लहान मुलाबाळांसह महिला आंदोलनात सहभागी झाल्या हाेत्या. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एक मराठा लाख मराठा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून साेडला.

जळगाव-नेऊर येथे रास्ता रोको आंदोलन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या येवला तालुक्यातील मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

जळगाव नेऊर येथे पंचक्रोशीतील मराठा आंदोलक सहभागी होत सुमारे 2 तास रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात भजनी मंडळ सहभागी होत आंदोलनकर्त्यांनी भजन म्हणत रास्ता रोको केला.

बालिंगा महामार्ग रोखला

मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आजही आंदाेलकांनी रास्ता राेकाे केला. कोल्हापुरातून कोकणाकडे जाणारा बालिंगा इथं महामार्ग रोखला. यावेळी मराठा आरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Edited By : Siddharth Latkar

mangaon traffic jam
Antarwali Sarati News : उदयनराजे भाेसलेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील उपाेषण स्थगित करणार? (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com