Shivpratishthan Hindustan : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Durga Daud : पाेलीसांच्या सूचनांचे पालन न केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलीसांनी दिली.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

Solapur Crime News : विजयादशमीला काढण्यात आलेल्या दुर्गामाता दौडमध्ये तलवार बाळगत तिचे प्रदर्शन केल्याप्रकरणी सोलापुर येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (shivpratishthan hindustan latest marathi news) कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत. (Maharashtra News)

Crime News
Maratha Reservation : सरकारला इशारा... 'जो माणूस मरायला तयार होतो तो मारायला सुद्धा तयार होतो' (व्हिडिओ पाहा)

सोलापूर पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये 19 ऑक्टोबरला शहर हद्दीत 21 ते 4 नोव्हेंबर 2023 या कालावधीत शस्त्रबंदीचा आदेश बजावला होता. हा आदेश असतानाही त्याचे पालन न करता दौडमध्ये हातात लोखंडी तलवार बाळगल्याबद्दल पाेलीसांनी कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार दुर्गा माता दौडसाठी परवानगी देताना दौडमध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगता येणार नाही अशा सूचना पोलीसांनी कार्यकर्त्यांना केली हाेती. त्याचे पालन न झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरषोत्तम कारकल, ओंकार देशमुख, अभिषेक इंगळे, समीर पाटील, ऋषिकेश धाराशिवकर यांच्यासह अन्य 4 ते 5 जणांवर (भादंवि कलम 188, भारतीय हत्यार कायदा कलम 4/25, मपोका 135 नुसार) गुन्हा नोंद केल्याची माहिती साेलापूर पाेलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Crime News
Ravikant Tupkar News : मंत्र्यांना विमा कंपन्यांकडून पैसे जातात; रवीकांत तुपकरांचा माेदी सरकारवर गंभीर आराेप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com