Sambhaji Bhide News : लबाड नेत्यांमुळे मराठा आरक्षण लांबत आहे असे मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) सांगलीत (sangli maratha andolan) सुरु असलेल्या साखळी उपोषणाला संभाजी भिडे (sambhaji bhide latest marathi news) यांनी भेट देत पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. (Maratha Aarakshan sambhaji bhide reaction allegations on Political Leaders)
संभाजी भिडे म्हणाले मराठा समाजाचे आंदोलन चिघळताच कामा नये. उद्या सूर्योदय होणार हे मनाेज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी लक्षात घेतले पाहिजे. मराठा समाजाचे नेतृत्व आता जरांगे पाटील यांच्याकडेच राहिले पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे असेही भिडेंनी नमूद केले. (Maharashtra News)
माझ्यासारखे आत एक बाहेर एक बोलणारे राजकारणी लोक आता लांब ठेवले पाहिजेत. जरांगे पाटील हे मनामध्ये वेगळा हेतू ठेवून काही करत नाहीत असेही भिडे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy cm devendra fadnavis) हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करणारी माणसे आहेत. ही माणसे कधीही लबाडी करणार नाहीत असा विश्वासही भिडेंनी व्यक्त केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हा चर्चेचा विषय असूच शकत नाही
मराठा समाजाला आरक्षण मिळणार का हा चर्चेचा विषय असूच शकत नाही. या हिंदुस्थानचा प्राण महाराष्ट्रात म्हणजे मराठा समाजात आहे. त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा (maratha reservation) प्रश्न नक्की सुटणार असा विश्वासही संभाजी भिडे यांनी माध्यमांशी बाेलताना व्यक्त केला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.