Viral Video: चक्रीवादळात सापडला आणि उडत गेला; हवेत उडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

Bareilly storm viral video: यूपीच्या बरेलीमध्ये आलेल्या भीषण चक्रीवादळाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे पत्र्याचे शेड हवेत उडाले आणि त्यासोबत एक व्यक्तीही अनेक फूट हवेत गेल्याची घटना घडली.
Bareilly storm viral video
Bareilly storm viral videosaam tv
Published On

तुम्ही कधी उडणारा माणूस पाहिला आहे का? आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून यामध्ये चक्क व्यक्ती उडून गेलेला दिसतोय. हा व्हिडीओ युपीच्या बरेलीतील असून बुधवारी या ठिकाणी आलेल्या चक्रीवादळामुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरात प्रचंड वाताहत झाल्याचं पाहायला मिळालं.

हवामानातील अचानक बदल आणि मुसळधार वादळ आणि पावसामुळे लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. शहराच्या अनेक भागांमध्ये झाडं उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले. या भीषण वादळात एक अपघात घडला, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला. या चक्रीवादळामुळे एक व्यक्ती आणि बांधकाम सुरू लग्नासाठी लावलेले पत्र्याचे शेड हवेत उडून गेले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

Bareilly storm viral video
Viral Video: महिलेने धावत्या कॅबमध्येच केली लघवी; ड्रायव्हर भडकताच दोघांमध्ये मोठा वाद, व्हिडीओ व्हायरल

हवेत कसा उडून गेला व्यक्ती

जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव नन्हे मियाँ असून तो बांधकाम सुरू असलेल्या लग्नाच्या सभागृहात उपस्थित होता. तेव्हा अचानक जोरदार वादळामुळे पत्र्याचे शेड कोसळू लागले. तिथे उपस्थित असलेले लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले. मात्र नन्हे मियाँने स्वतःला वाचवण्यासाठी त्या पत्र्याच्या शेडला बांधलेली दोरी पकडली. त्यानंतर तो पत्र्याचा शेड उडून गेला.

Bareilly storm viral video
Viral Video: ५०० किलो मगरीच्या पोटात सापडला व्यावसायिकाचा मृतदेह; हेलिकॉप्टरला लटकून पोलिसांकडून थरारक ऑपरेशन, पाहा व्हिडिओ

प्रत्यक्षदर्शींच्या मते, वारा इतका जोरात होता की, काही सेकंदातच संपूर्ण पत्र्याचे शेड कोसळले आणि नन्हे मियाँसुद्धा त्यासोबत अनेक फूट हवेत उडाले. हे दृश्य पाहून जवळ उपस्थित असलेल्या लोकांनी आरडाओरडा केला.

Bareilly storm viral video
Viral Video: तरूणाने मुलीची छेड काढताच आईचं रौद्र रूप समोर! भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी तुडवलं

नन्हे मियाँ गंभीर जखमी

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जोरदार वाऱ्यामुळे पत्र्याचे शेड अचानक हवेत गेले आणि त्यासोबत एक व्यक्ती देखील उडत होता दिसत आहे. तो काही अंतरावर खाली पडला. यावेळी त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झालीये. ते सापडताच त्यांना जवळच्या रहिवाशांनी त्याला तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com