

आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये एक कॅब चालक आणि महिला प्रवाशामध्ये मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळतंय. या महिलेने कॅबमध्येच लघवी केल्याने हे त्या दोघांमध्ये मोठा वाद झाल्याचं समोर आलं आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, या कॅबमधून प्रवास करणाऱ्या महिलेने बसल्याठिकाणीच लघवी केल्याचा आरोप चालकाने केला आहे. तिच्या या कृत्याने चालक चांगलाच संतापलेला दिसतोय. यावेळी तो महिलेच्या अशा चुकीच्या वागणूकीवर प्रश्न उपस्थित करतोय.
तर दुसरीकडे ती महिला त्याच्याशी शांतपणे बोलताना दिसतेय. इतकंच नाही तर ती त्याला गाडीची सफाई करून देणार असल्याचंही सांगतेय. मात्र तो चालक संतापलेला असल्याने दोघांमध्येही मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर विविध कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये काहींनी त्या महिलेच्या कृत्यावर टीका केली आहेत. तर काहींनी संपूर्ण गोष्ट जाणून घेतल्याशिवाय निष्कर्ष काढणं योग्य नसल्याचं म्हटलंय.
काही युजर्सने म्हटलंय की, 'सार्वजनिक किंवा खाजगी वाहनात अशा प्रकारची वागणूक चुकीची आहे. तर काही जण सावध भूमिका घेत म्हणतात, पहिल्यांदा महिलेचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे असं म्हटलंय. तर एका युजरने, कदाचित तिची मेडिकल कंडिशन तशी असू शकते, असंही म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.