Viral Video: रील बनवण्याच्या नादात दुचाकी थेट ट्रकखाली घुसली, ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू; अपघाताचा थरारक VIDEO

Reel accident India: मध्य प्रदेशात रील बनवताना वेगाने बाईक चालवत स्टंट करणाऱ्या तरुणांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत. सोशल मीडियाच्या नादाचा हा धोकादायक परिणाम आहे.
Reel accident India
Reel accident Indiasaam tv
Published On

सोशल मीडिया आणि रील या नादात काही तरूणांनी त्यांचा जीव गमावला असल्याचं समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यात एक अपघात झाला. या अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा उभा राहणार आहे

१४ एप्रिल रोजी घडलेल्या या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी दोन जण गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाख आहेत. सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याची धडपड या सर्व गोष्टींमागे कारणीभूत ठरल्याचं दिसून आलं आहे.

Reel accident India
मोबाइल ओढला, धक्का दिला; लोकलच्या महिला डब्यात तुफान राडा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पल्सर २२० या बाईकवर तीन तरुण ओव्हर स्पीडिंग करत स्टंट करत होते. बाईकचा वेग ताशी १०० ते १२० किमी दरम्यान होता. रील शूट करण्याच्या नादात ते बेफामपणे गाडी चालवत होते. इतकंच नाही तर त्यांच्या हातात पिस्तुलासारखा दिसणारा लायटर होता. हा लायटर ते हवेत फिरवत स्टंट करत होते. दुसऱ्या बाईकवर त्यांचे मित्र हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये शूट करत होते.

हे तरुण रस्त्यावरून वेगात जाताना मोठ्या ट्रकांच्या मधून झिग-झॅग पद्धतीने बाईक चालवत होते. एकमेकांना ओव्हरटेक करण्याची स्पर्धा आणि कॅमेऱ्यासमोर स्टाईल मारण्याच्या नादात त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. याच वेळी रस्त्याच्या कडेला उभा असलेला एक ट्रक त्यांच्या नजरेस पडला नाही आणि भरधाव वेगात त्यांची बाईक थेट ट्रकच्या मागच्या भागावर आदळली.

Reel accident India
Latur : लातूरमध्ये गतीमंद विद्यार्थ्याला फळी तुटेपर्यंत मारलं; शिक्षकाच्या क्रूरतेचा Video व्हायरल

हा अपघात इतका भीषण होता की, पल्सरवर बसलेले उपलक्ष उर्फ शुभम कोल (१७), अमरीश कोल (२२) आणि हेमराज कोल (१७) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या बाईकवर असलेले प्रशांत द्विवेदी (१९) आणि प्रदीप द्विवेदी (१७) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com