Viral Video: तरूणाने मुलीची छेड काढताच आईचं रौद्र रूप समोर! भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी तुडवलं

Viral Social Media Video: कानपूरमध्ये मुलीचा विनयभंग झाल्यानंतर आईने भर रस्त्यात संबंधित तरुणाला चपलेने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तपास सुरू केला असून तक्रारीची प्रतीक्षा आहे.
Viral Social Media Video
Viral Social Media Videosaamtv
Published On

सध्या कानपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये एक महिला एका व्यक्तीला चपलेने मारताना दिसतेय. मुलीचा विनयभंग झाल्यावर या महिलेने भर रस्त्यात संबंधित व्यक्तीला चोप दिला आहे. तिने रस्त्याच्या मधोमधच विनयभंग करणाऱ्याला धडा शिकवला. या कृत्याने रस्त्यावर उपस्थित असलेल्या सर्वांनी एका आईचं रौद्ररूप पाहिलंय.

काय घडला नेमका प्रकार?

मंगळवारी संध्याकाळी एक महिला आपल्या १४ वर्षांच्या मुलीसोबत बिल्हौर बाजारात गेली होती. वाटेत तिच्या मुलीचा एका माणसाने तिचा विनयभंग केला. यावेळी त्या मुलीने आरडाओरड केली. आपल्या मुलीचा आक्रोश ऐकून, आईने तात्काळ त्या माणसाला पकडलं. तिने त्याला जमिनीवर पाडलं आणि चपलेने, लाथांनी आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

अवघ्या ३४ सेकंदात, त्या महिलेने विनयभंग करणाऱ्याला अंदाजे १० वेळा कानशिलात लगावली आणि आठ वेळा लाथ मारली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या संपूर्ण घटनेचं शूटींग केलं आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Social Media Video
Office Desk Vastu: नोकरीत नवी संधी आणि प्रमोशन मिळत नाहीये? ऑफिसच्या डेस्कवरून या गोष्टी लगेच काढून टाका

ती महिला आपल्या १४ वर्षांच्या मुलीसोबत शहरातील बाजारात खरेदीसाठी गेली होती. महानगरपालिका चौकाजवळ असलेल्या बिल्होर इंटर कॉलेजसमोर एका तरुणाने तिच्या मुलीचा विनयभंग केला. मुलीने त्या तरुणाची कॉलर पकडून आरडाओरडा केला. त्यानंतर त्या महिलेने त्याला पकडले आणि चपलेने व लाथांनी त्याला बेदम मारहाण केली.

Viral Social Media Video
Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

ती महिला त्या पुरुषाला मारहाण करत असताना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. कोणीतरी या मारहाणीचे शूटींग करून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय. तयानंतर तो पुरुष पळून गेला. तर ती महिला आपल्या मुलीसोबत निघून गेली.

Viral Social Media Video
Diabetic Kidney Problems: मधुमेही रूग्णांमध्ये ही ३ प्रमुख लक्षणं दिसली तर व्हा सावध; किडनी निकामी होण्याचा धोका

पोलीस निरीक्षक सुधीर कुमार यांनी सांगितले की, कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे तपास सुरू आहे. तक्रार प्राप्त झाल्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com