Viral Video: ५०० किलो मगरीच्या पोटात सापडला व्यावसायिकाचा मृतदेह; हेलिकॉप्टरला लटकून पोलिसांकडून थरारक ऑपरेशन, पाहा व्हिडिओ

Viral Video South Africa: दक्षिण आफ्रिकेत मगराच्या पोटात मानवी अवशेष सापडल्याची घटना समोर आली. हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलेल्या धोकादायक ऑपरेशनचा व्हिडिओ व्हायरल होत असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.
 South Africa Human Remains Found In Crocodile Helicopter Viral Vide
South Africa Human Remains Found In Crocodile Helicopter Viral VideSaam tv
Published On

Viral Video: दक्षिण आफ्रिकेत एक धक्कादायक आणि थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका भल्यामोठ्या ५०० किलोच्या मगराच्या पोटात मानवी अवशेष सापडल्याने खळबळ उडाली आहे.

ही घटना कोमाटी नदी परिसरात घडली. एका ५९ वर्षीय व्यावसायिकाचा काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची माहिती होती. तो पूरग्रस्त पाण्यात वाहून गेल्यानंतर त्याचा शोध सुरू होता. शोधमोहीमेदरम्यान अधिकाऱ्यांना एक संशयास्पद मगर दिसली, ज्याचे पोट खूप फुगलेले होते. त्यामुळे त्या मगरानेच त्या व्यक्तीला गिळले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला.

 South Africa Human Remains Found In Crocodile Helicopter Viral Vide
Trisha Krishnan: त्रिशाला व्हायचंय मुख्यमंत्री; १२ वर्षांपूर्वीच व्यक्त केली इच्छा,थलपती विजय यांचे चाहते म्हणाले 'पुढची जयललिता'

यानंतर एक अत्यंत धोकादायक ऑपरेशन राबवण्यात आले. पोलिस अधिकाऱ्याला हेलिकॉप्टरमधून थेट मगर असलेल्या नदीत खाली उतरवण्यात आले. त्याने त्या मगरीला दोरीने सुरक्षितपणे बांधले आणि मग हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्यात आले. हा संपूर्ण प्रकार अत्यंत जोखमीचा होता, कारण त्या परिसरात इतरही अनेक मगरी होत्या.

 South Africa Human Remains Found In Crocodile Helicopter Viral Vide
Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट! प्रॉपर्टी कागद लपवताना प्रिया कृष्णाच्या तावडीत सापडणार

मगरीला बाहेर काढल्यानंतर तिची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिच्या पोटात मानवी अवशेष आढळले. यामध्ये शरीराचे काही भाग आणि वैयक्तिक वस्तूही सापडल्याची माहिती समोर आली आहे. हे अवशेष बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याची खात्री करण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून लोकांनी या धाडसी ऑपरेशनचे कौतुक केले आहे. पोलिस अधिकाऱ्याने जीव धोक्यात घालून केलेल्या या कारवाईचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com