Trisha Krishnan: त्रिशाला व्हायचंय मुख्यमंत्री; १२ वर्षांपूर्वीच व्यक्त केली इच्छा,थलपती विजय यांचे चाहते म्हणाले 'पुढची जयललिता'

Trisha Krishnan: तमिळनाडू निवडणुकीत थलापती विजय यांच्या विजयामुळे अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा चर्चेत. १२ वर्षांपूर्वीचा मुख्यमंत्री होण्याचा दावा असलेला व्हिडिओ व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
Trisha Krishnan
Trisha KrishnanSaam Tv
Published On

Trisha Krishnan: तमिलनाडूमध्ये अभिनेते थलापती विजय यांच्या भरगोस यशानंतर आता चाहते जल्लोषाचा आनंद साजरा करत आहे. तमिळनाडूमध्ये विजयच्या TVK पार्टीने इतिहास रचून सगळ्यांना थक्क केलं आहे. आता तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 च्या निकालांनंतर साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेता ते राजकारणी बनलेले थलपती विजय यांच्या पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत केली. पण १२ वर्षांपूर्वीचा त्रिशाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या विजयानंतर त्रिशाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती आत्मविश्वासाने “मी एक दिवस मुख्यमंत्री बनेन” असे म्हणताना दिसते. हा व्हिडिओ तब्बल १२ वर्षांपूर्वीचा असून, विजयच्या यशानंतर पुन्हा समोर आल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Trisha Krishnan
Thalapathy Vijay: विजय यांना 'थलपती' का म्हणतात? जाणून घ्या काय आहे कारण?

४ मे रोजी निकाल लागला आणि याच दिवशी त्रिशाचा वाढदिवस होता. मधल्या अनेक काळापासून त्रिशा आणि विजय हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. हा योगायोग अधिक चर्चेचा विषय ठरला. वाढदिवसाच्या दिवशी ती विजयच्या घरी गेल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे दोघांमधील जवळीक आणि भविष्यातील राजकीय शक्यता यावरही चर्चा सुरू झाली आहे.

Trisha Krishnan
Thalapathy vijay Party: थलापती विजय यांच्या पक्षाचं नाव काय?

सोशल मीडियावर अनेक चाहते त्रिशा आणि विजय यांच्या जोडीची तुलना तमिळनाडूच्या दिग्गज नेते जे. जयललिता आणि एम. जी. रामचंद्रन यांच्याशी करत आहेत. काहींनी तर त्रिशाला “लेडी लक” तर काही नेटकरी त्रिशा ही पुढची जयललिता असणार अशी देखील कमेंट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com