Trisha Krishnan : अभिनेत्री त्रिशा कृष्णन उपमुख्यमंत्री होणार? तामिळनाडूत राजकीय वातावरण तापलं

TVK Party Tamil Nadu : अभिनेत्री त्रिशा कृष्णन टीव्हीके पक्षात प्रवेश करून पोटनिवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. विजय थलपतींच्या विजयानंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून त्रिशा उपमुख्यमंत्री होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vijay Thalapathy TVK party latest news Update : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय थलपतींच्या टीव्हीक पक्षाने घवघवीत यश मिळवलं...यानंतर आता अभिनेत्री त्रिशा कृष्णन टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय..विजय थलपतीने पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व मतदारसंघातून विजय मिळवल्याने तिरुचिरापल्लीची जागा ते सोडू शकतात..या जागेवर त्रिशा कृष्णन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.. त्यामुळे त्रिशा कृष्णन खरंच राजकारणात प्रवेश करुन पोटनिवडणूक लढवणार का? आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

अभिनेत्री त्रिशा कृष्णन तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती यांच्या 'टीव्हीके' (TVK) पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर, त्रिशा या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विजय थलपती यांनी पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व अशा दोन मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी तिरुचिरापल्लीची जागा सोडल्यास, त्या रिक्त जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीत त्रिशा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, निवडणूक जिंकल्यानंतर त्रिशा कृष्णन यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. त्रिशा खरोखरच राजकारणात उतरून ही पोटनिवडणूक लढवणार का आणि त्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com