Walmik Karad: स्पेशल चहा, चिकन मटन अन् बरंच काही...; वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट, रणजीत कासलेंचा दावा|VIDEO

Chicken, Chapatis & Comfort: सरपंच संतोष देशमुख यांचा मुख्य आरोपी वाल्मीक कराडला जेलमध्ये रॉयल सुविधा मिळत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी केला आहे.

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला जेलमध्ये वीआयपी सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना जामीन मिळाला असून त्यांनी वाल्मीक कराडला जेलमध्ये सुख सुविधा मिळत असल्याचा दावा केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत खळबळजनक आरोप केले आहे. जामिनावर बाहेर येताच त्यांनी जेलमधील काही घटना सांगितल्या. कराडला फरसान, तीन लेयरच्या चपात्या दिल्या जातात. तसेच प्रत्येक बुधवार आणि रविवारी चिकन दिले जात असल्याचा दावाही कासले यांनी केला. आपण जेलमध्ये हे सगळे पहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com