Beed: 'परळीत ये तुला कोयत्याने तोडतो'; मारहाण आधीचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, संतोष देशमुख पार्ट २ करू म्हणत..

Pre-Beating Phone Call Recording Reveals Threats Beed: परळीत मुंडे टोळीच्या सदस्यांनी एका युवकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे.
Beed Crime News
Beed Crime NewsSaam Tv
Published On

बीडच्या परळीत मुंडे टोळक्यांनी एका युवकाला बेदम मारहाण केली होती. नंतर जबरदस्तीने पाया पडायला लावलं. याचा व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत ७ आरोपींना बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे, या अमानुष मारहाणेपूर्वीचा धमकीचा कॉल रेकॉर्डिंग आता समोर आला असून, कॉल रेकॉर्डींग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

परळीतील शिवराज दिवटे या युवकाला सात ते आठ जणांनी मिळून बेदम मारहाण केली. मारहाण होण्याआधीची कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या रेकॉर्डिंगमध्ये शिवराज दिवटे आणि आरोपींमध्ये फोनवर झालेला संवाद स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे.

Beed Crime News
Pune ISIS Case: पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात २ दहशतवाद्यांना अटक; NIA ची मोठी कारवाई

साम टीव्हीच्या हाती लागलेल्या कॉल रेकॉर्डिंगनुसार, आरोपींकडून शिवराज दिवटे यांना धमकी देण्यात आली होती. "परळीत ये, तुला काय आहे ते दाखवतो... कोयत्याने तोडतो," अशा प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्या या संवादात ऐकायला मिळत आहेत.

या प्रकरणात वाल्मीक कराड आणि गोट्या गीते टोळीच्या गुंडांकडून शिवराज यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या टोळीचा सूत्रधार आदिनाथ उर्फ आदित्य गीते असून, त्यानेच दिवटे यांना थेट फोन करून धमकी दिल्याचं रेकॉर्डिंगमधून समोर आलं आहे.

Beed Crime News
Pune News: राज्यात एकाच दिवशी ३ तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू, खेड, पिंपरी-चिंचवड अन् मावळमध्ये हळहळ

या रेकॉर्डिंगमुळे या गुन्ह्याचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. आधीच अमानुष मारहाण झाल्यानं बीडमध्ये संताप व्यक्त केला जात असतानाच, आता या कॉल रेकॉर्डिंगमुळे हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे. या धक्कादायक घटनेमुळे बीड पुन्हा एकदा हादरले आहे.

Beed Crime News
उल्हासनगर हादरलं! नराधमाकडून चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार, आधी शौचालयात नेलं अन्..| Ulhasnagar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com