Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Mumbai Locals Celebrating: राज आणि उद्धव ठाकरे तब्बल १९ वर्षांनी एकत्र आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे. मराठी भाषा मुद्यावर एकत्रित झालेल्या या ऐतिहासिक मेळाव्याचं सेलिब्रेशन मुंबई लोकलमध्येही पाहायला मिळालं

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर घडणाऱ्या अनेक युतींपैकी एक म्हणजे ठाकरे बंधूंच मनोमीलन मराठी भाषेच्या मुद्यावरून ठाकरे बंधूंचा मुंबईत एकत्रित विजयी मेळावा होत आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. हिंदी सक्तीनंतर दोन्ही बंधुनी एकत्र येत याचा कडाडून विरोध केला. यानंतर सरकारला गुडघ्यावर बसून हा शासन निर्णय रद्द करावा लागला. याचाच विजय मेळावा आज मुंबईतील वरळी डोममध्ये पार पडत आहे. राज आणि उद्धव ठाकरे तब्बल 19 वर्षांनंतर एकत्र येत असल्याने संपूर्ण मराठी बांधव हा आनंदित झाला असून मुंबईच्या लोकलमध्ये देखील याचे सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com