Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Mumbai Police Save Women From Drowing In Bandra Sea: मुंबई पोलिसांच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. बुधवारी एका महिलेने वांद्रा येथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस कॉन्स्टेबल साईनाश देवडे यांनी प्रसंगावधान दाखवत महिलेचा जीव वाचवला आहे.
Mumbai Police
Mumbai PoliceSaam Tv
Published On

मुंबई पोलिस नेहमीच नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. याची प्रचिती पुन्हा एकदा आली. काल वांद्रा बॅन्डस्टॅण्ड येथे आत्महत्या करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी वाचवले आहे. ही महिला वांद्रा बॅन्डस्टॅण्ड (Bandra Bandstand) येथे समुद्रात उडी मारुन आत्महत्या करत होती. याचवेळी एका पोलिस कॉन्स्टेबलने प्रसंगावधान दाखवून महिलेचा जीव वाचवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ही घटना घडली आहे.एका ५३ वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही महिला मानसिक तणावात होती. तिने या तणावातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला वाचवण्यात आले आहे. आता तिची स्थिती बरी आहे. तिला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Mumbai Police
Pune Police : नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले सोमय मुंडे पुण्याचे नवीन पोलिस उपआयुक्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ५ वाजता ही घटना घडली आहे. ही महिला ५३ वर्षीय होती. या महिलेने अचानक वांद्रा येथे समुद्रात उडी मारली. यावेळी पोलिस कॉन्स्टेबल साईनाथ देवडे तिथे होते. त्यांनी ही घटना बघताच समुद्रात उडी मारली. त्यानंतर त्यांनी या महिलेला पाण्यातून बाहेर काढले.

ही महिला खूपच अस्वस्थ होती. त्यानंतर तिला पोलिसांना वांद्रा पश्चिम येथील भाभा रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. तिच्यावर उपचार झाल्यानंतर तिला तिच्या कुटुंबियांकडे देण्यात आले. या महिलेला मानसिक आजार होता. त्यामुळे तिने समुद्रात उडी मारली असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिस साईनाश देवडे यांच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे या महिलेचा प्राण वाचला आहे. ही महिला सेंट बापटिस्ट रोड वांद्रा पश्चित येथे राहते. ती मागच्या २० वर्षांपासून नैराश्येत आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहे.

Mumbai Police
Mumbai Local: लोकलमधून प्रवासी पडला अन्...; हार्बरची सेवा विस्कळीत|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com