छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Hindi in CBSE and UPSC Preparation: संजय गायकवाड यांनी हिंदी भाषेचे समर्थन करताना शिवाजी महाराजांनी शिकलेल्या १६ भाषांचा दाखला दिला. ठाकरे बंधूंवर टीका करत त्यांनी गरीब मुलांना यूपीएससी-एमपीएससीसाठी हिंदी आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं.

बुलढाणा: शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे बंधुचे मिलन आणि हिंदीभाषा सक्तीवरून भाष्य केले आहे. बुलढाणा येथे आयोजित पत्रकार परिषदमध्ये ठाकरे बंधु एकत्र आले आहे यावर विचारले असता ते म्हणाले, बाळासाहेबांना जे जमले नाही ते दोन्ही ठाकरे बंधु आज योगायोगाने का होईना एकत्र आले त्यांना माझ्या शुभेच्छा. हिंदी भाषेचे समर्थन करताना ते म्हणाले, हिंदी ही राष्ट्रभाषा असून प्राथमिक शिक्षणातून हिंदी भाषा शिकवण्यात यावी व गोरगरिबांची मुलांना यूपीएससी, एमपीएससी द्वारे उच्च शिक्षण द्यावे असही ते म्हणालेत.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व इतरांनी 16 भाषा शिकून काही चूक केली का? आज जे बोलतायेत त्यांना हे कळायला पाहिजे. राज्यकर्त्यांना सर्वच भाषा यायला पाहिजेत. आम्ही जर परराज्यात गेलो तर तिकडे आपण आपली भाषा बोलणार आहोत का ? हे 300 400 वर्षांपूर्वीच्या राज्यकर्त्यांना कळलं.

आपल्या भाषेचा आपल्या राज्यात कुणी तिरस्कार करत असेल तर त्याला धडा शिकवण मान्य आहे. पण दुसऱ्या भाषेचा ही तिरस्कार करू नये. राज्यात आणि शहरी भागात जवळपास सर्वांची मुलं सीबीएससीमध्ये शिक्षण घेतात. त्यांना हिंदी सक्तीची असते. त्यांना सुरुवातीपासून हिंदी भाषा आहे. मग तुम्हाला काय गरिबांची मुलं यूपीएससी, एमपीएससी कलेक्टर एस पी होऊ द्यायची नाहीत का? असाही सवाल त्यांनी ठाकरे बंधूंना केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com